BJP : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून अशोक चव्हाणांना भाजपात येण्याची ऑफर
Prataprao Chikhalikar : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे.
Ashok Chavan : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. ते नांदेड येथे बोलत होते. अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी गैरहजर राहून व उस्मानाबाद व औरंगाबादच्या नामांतरास पाठींबा दिल्याबद्दल धन्यवाद, असे खासदार चिखलीकर म्हणाले.
यावेळी बोलताना चिखलीकर यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत, असल्याचं सांगितले. ते म्हणाले की, माजी मंत्री अशोक चव्हाण हे शिंदे सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी स्वतः गैरहजर राहिले. तसेच त्यांनी स्वत:सह जिल्ह्यातील चार आमदार गैरहजर ठेवून औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामातरास पाठिंबा देत अप्रत्यक्षरित्या भाजपाला पाठिंबाच दिलाय. त्यामुळे त्यांचे आभारच मानले पाहिजेत. तसेच ते जर भाजपात आले तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांचे मी स्वागत करेन, असे म्हणज प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
खासदार चिखलीकर यांच्या या ऑफरवर अशोक चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यांच्या प्रतिक्रियाकडे सर्वांचं लक्ष लागलेय. अशोक चव्हाण काँग्रेसचे मराठावाड्याचे महत्वाचे नेते मानले जातात.
नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा खासदार चिखलीकरांचा पाहणी दौरा -
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होवून 100 % मदत मिळेल, असे आश्वासन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेतकऱ्यांना दिले. ते नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीचा पाहणी दौरा करत होते. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे,ऊस, केळी, हळद ,कापूस, सोयाबीन ही पिके पाण्याखाली जाऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी जिल्हा प्रशासनासह, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीय. या पूर परिस्थितीची पाहणी करताना खा. प्रताप पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीची शासनाकडून पूर्ण भरपाईचे आश्वासन दिलेय. यावेळी शेतीचे नुकसान झालेले आहे, ऐवढी वाईट परिस्थिती मागच्या वर्षी पण नव्हती. तर गेल्या वर्षी पेक्षाही वाईट परिस्थिती यावर्षी शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे शंभर टक्के पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देऊन. नुकसानग्रस्त भागाचे 100 टक्के पंचनामे होतील व मदतही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन खासदारांनी दिलेय. तसेच काही लोकांच्या घरात पाणी गेलेल आहे. अशा गरीब माणसाच्या घरामधील धान्य पुरामुळे भिजलेय.त्यामुळे ते उपाशी राहू नयेत , यासाठी त्यांना तात्काळ धान्य देण्याच्या संदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. तर या अतिवृष्टीमुळे 76 पैकी 33 मंडळात अतोनात नुकसान झाली आहे.