Ashok Chavan : अपेक्षेप्रमाणं मतं मिळू शकली नाहीत ही खेदाची बाब, विधानपरिषद निवडणुकीत काळजी घ्यावीच लागेल : अशोक चव्हाण
राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणं मतं मिळू शकली नाहीत ही खेदाची बाब असल्याचं चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan : राज्यसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणं मतं मिळू शकली नाहीत ही निश्चितच खेदाची बाब असल्याचं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केलं. अपक्ष मतदारांकडून अपेक्षेप्रमाणं मतं मिळू शकली नाहीत अस खुद्द संजय राऊत यांनी सांगितल्याचे चव्हाण म्हणाले. दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत काळजी घ्यावीच लागेल असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. राज्यसभा निवडणुकांच्या निकालासंदर्बात त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता नांदेडमध्ये ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यातील एकमेव शेकाप आमदारांनी भाजपला केलेल्या मतदानाविषयी विचारले असता ते आमच्या कोट्यातील नव्हते. त्याचं मत ज्यांच्या कोट्यात होते ते सांगतील असे म्हणत अशोक चव्हाण यांनी या विषयावर बोलणं टाळलं. तसेच येत्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत निश्चितच काळजी घ्यावी लागेल अशी भावना चव्हाण यांनी बोलून दाखवली.
राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. धनंजय महाडिक यांना 41.5 मतं मिळाली आहेत. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. राज्यसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेली मतं पाहता महाविकास आघाडीची चिंता निश्चितपणे वाढली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरुन शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
राज्यसभेचे विजयी उमेदवार
1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43
2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44
3. पियुष गोयल-भाजप- 48
4. अनिल बोंडे- भाजप- 48
5. संजय राऊत- शिवसेना- 42
6. धनंजय महाडिक- भाजप - 41
महत्वाच्या बातम्या: