Vidarbha Weather Update: विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा! बहुतांश जिल्ह्यात पारा 35 अंशाच्या वर; कुठं किती तापमानाची नोंद?
Vidarbha Temperature News : नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेच्या पारा पुन्हा वाढला आहे. आज विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली वगळता उर्वरित 8 जिल्ह्यात कमाल तापमानाने 35 अंश सेल्सिअसच्या आकडा पार केला आहे.
Vidarbha Weather Update : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाने उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्याकाही दिवसांत अवकळी पाऊस, गारपीट आणि ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील (Vidarbha) पारा काही अंशी खाली गेला होता. मात्र, काल गुरुवार पासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेच्या पारा पुन्हा वाढला आहे. आज विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली वगळता उर्वरित 8 जिल्ह्यात कमाल तापमानाने 35 अंश सेल्सिअसच्या आकडा पार केला आहे.
आज शुक्रवारी विदर्भात वाशिम(Washim) जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान 38.4 अंश सेल्सिअस, तर त्या खालोखाल यवतमाळ (Yavatmal)) आणि अकोलामध्ये (Akola) 38.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर पुढील पाच दिवस तापमानात 2-4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.
विदर्भात वाढल्या उन्हाच्या झळा!
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातारणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. अशातच आजपासून पुढील चार दिवस विदर्भातील (Vidarbha) बहुतांशी भागात उष्णतेच्या पारा पुन्हा वाढत जाणार आहे. मधल्या काळात झालेल्या अवकळी पाऊस आणि गारपीटीमुळे विदर्भात काही अंशी कमाल तापमानात घट झाली होती. मात्र आता इथून पुढे पुन्हा तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. काल 21 मार्चला विदर्भात सर्वाधिक तापमान 38. 4 अंश सेल्सिअस वाशिम (Washim) जिल्ह्याचे नोंदविण्यात आले होते. आज त्यात 4 अंश सेल्सिअसची घट झाली असली तरी पुढील 5 दिवस तापमानात वाढ होण्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
असे आहे विदर्भाचे आजचे तापमान
जिल्हे | कमाल | किमान |
अकोला | 38.0 | 19.1 |
अमरावती | 36.0 | 19.0 |
बुलढाणा | 35.5 | 19.8 |
ब्रम्हपुरी | 36.6 | 20.3 |
चंद्रपूर | 36.4 | 18.0 |
गडचिरोली | 34.6 | 18.0 |
गोंदिया | 33.8 | 18.4 |
नागपूर | 35.0 | 18.6 |
वर्धा | 36.1 | 19.2 |
वाशिम | 38.4 | 17.2 |
यवतमाळ | 38.0 | 21.5 |
मुंबईसह ठाण्यात वाढल्या उन्हाच्या झळा!
मुंबईमध्ये काल 2024 या वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. मुंबईमधील (Mumbai News)काल किमान तापमान 38.8 अंश सेल्सिअसवर असल्याचे नोंदविण्यात आलंय. येत्या दोन ते तीन दिवसात मुंबईतील तापमान चाळिशीच्या जवळपास राहण्याचा अंदाज देखील प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे देखील तापलेले असून काल 38. 6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
अरबी समुद्रामध्ये सध्या गुजरात वरती अँटी सायक्लोनची निर्मिती होत असून त्यामुळे पश्चिम ऐवजी पूर्व बाजूने वाऱ्यांचा वेग दिसतो आहे. ज्यामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक केंद्रने दिली आहे. पूर्वेकडील प्रवाहामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या