Nagpur News : तुरुंगात शिक्षा भोगत असताना झाला वकील, स्वत:च्या शिक्षेला आव्हान देत हायकोर्टात याचिका
याचिकाकर्त्याने सर्व पुरावे मिळाल्याचे सांगत त्या आधारावर प्रकरणाची अंतिम सुनावणीची तयारी दर्शवली. गेल्यावेळी मांडण्यात आलेल्या बाजूवर निर्णय झालेला नसल्याने आनंदला परत तुरुंगात पाठवण्यात आले होते.
Nagpur News Update : खून प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर एका आरोपीने तुरुंगात राहूनच वकिलीचा (LLB) अभ्यासक्रम पूर्ण केला. आता स्वत:च्या शिक्षेला आव्हान देत हायकोर्टात (High Court) फौजदारी अपील दाखल केली आहे. आनंद अडतानी असे त्याचे नाव असून, त्यास भादंवीच्या कलम 302 अंतर्गत गंभीर प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासाठी न्यायिक सहाय्यता पॅनलची मदत किंवा न्यायालय मित्र असे दोनच पर्याय त्याच्याकडे आहेत. त्याने या दोन्ही पर्यायास नकार दर्शवला. त्यानंतरही न्यायालयाने अॅड. पीआर अग्रवल यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. सोबतच, याचिकाकर्त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर न्यायालयात सादर करुन अंतिम सुनावणीचे आदेश दिले.
कायद्याचे पुरेसे ज्ञान असल्याचा दावा
आनंदने तुरुंगात राहून 2019 मध्ये एलएलबीची पदवी घेतली. त्याला कायद्याचे पुरेसे ज्ञान आहे. मात्र, न्यायालयाने अशा प्रकरणी यापूर्वीही अनेक आदेश आणि निर्देश दिल्याचे सांगितले. अॅड. मीर नागमन अली यांचीही वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांनी प्रकरण सोडून दिले होते. तर, याचिकाकर्त्याने त्याच्याशी निगडीत सर्व पुरावे मिळाल्याचे सांगत त्या आधारावर प्रकरणाची अंतिम सुनावणीची (Final Hearing) तयारी दर्शवली. गेल्यावेळी याबाबत मांडण्यात आलेल्या बाजूवर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आनंदला परत तुरुंगात पाठवण्यात आले होते. आता न्यायालयाने अभियोजन पक्षाच्या मदतीने वकील नियुक्त केले आहे.
परीक्षेसाठी अनेकदा अटीनुसार जामीन
वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्यासोबतच नागपूर विद्यापीठातर्फे वेळोवेळी घोषित परीक्षेला बसण्यासाठी हायकोर्टाने अटीनुसार जामीन दिला होता. कागदपत्रानुसार याचिकाकर्त्याचे शैक्षणिक योग्यता चांगली असल्याचे न्यायालयास वाटते. खूनप्रकरणात अटक झाली असली तरी शिक्षणासाठी सूट दिली जाऊ शकते. याप्रकरणी सहा वर्षापूर्वी 2016 मध्ये दाखल अपीलवर प्रतिवादींना नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने सुनावणी झाली. आता हायकोर्टाने अंतिम सुनावणीचे संकेत दिले असून, प्रकरणाचा लवकर निपटारा केला जाणार आहे.
कैद्यांसाठी विविध उपक्रम
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) असे अनेक कैदी आहेत ज्यांनी रागात येऊन गुन्हा केला. आता ते आपलं आयुष्य तुरुंगात घालवत आहेत. ना कुटुंबाला भेटण्याची संधी मिळत आणि ना मुलांचा चेहरा पाहायला मिळत. अनेकदा या कैद्यांची पॅरोल आणि फर्लो रजा रद्द होते. त्यामुळे त्यांना कुटुंबाशी भेटण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे बहुतांश कैदी निराश होतात. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा कुटुंब आणि मुलांनाही मिळते. तुरुंगात बंद असलेल्या आई-वडिलांना ते भेटू शकत नाहीत. त्यामुळे कैद्यांच्या मुलांना कारागृह विभागाकडून आपल्या पालकांना भेटण्याची संधी दिली गेली. या अंतर्गत कारागृहात कैद्यांच्या मुलांसाठी गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ही बातमी देखील वाचा
Nagpur Crime : लिंकवर क्लिक करणे तरुणीला पडले महागात, तिच्यासह आई-वडिलांचे खातेही रिकामे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI