नागपुरात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र 7 मार्चपर्यंत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक कडक निर्बंध
नागपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शिवाय सर्व आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद ठेवले जाणार आहे.
![नागपुरात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र 7 मार्चपर्यंत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक कडक निर्बंध Nagpur Lockdown News no lockdown Right now in Nagpur several strict restrictions till March 7 नागपुरात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र 7 मार्चपर्यंत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक कडक निर्बंध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/22192649/nagpur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपुरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेत प्रशासनिक अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. त्यामध्ये नागपुरात तूर्तास लॉकडाऊन लावले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 7 मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहे.
त्यामध्ये दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शिवाय सर्व आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद ठेवले जाणार आहे. 7 मार्चपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसही बंद ठेवले जाणार आहे. तसेच गेल्या काही महिन्यात बंद करण्यात आलेल्या कोविड केयर सेंटर्स पुन्हा सुरु करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर जिल्ह्यासंदर्भात प्रशासनाने घेतलेले निर्णय
- आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद
- मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद
- 7 मार्चपर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील
- हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील
- सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्च पर्यंत बंद राहतील
- मंगल कार्यालय 25 फेब्रुवारीनंतर 7 मार्चपर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न
- करता येईल. मंगल कार्यालय मध्ये 7 मार्चपर्यंत लग्न होणार नाही.
- बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार
- नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार
नागपूर शहरातील बेड्सचं नियोजन
- नागपूरात 2 डेडिकेटेड कोविड केयर सेंटर (DCC) आहेत
- GMC हॉस्पिटलमध्ये 1000 बेड्सची क्षमता
- मेयो हॉस्पिटलमध्ये 660 बेड्सची क्षमता
- नागपुरात सध्या 1 कोविड केयर सेंटर (CCC)
- पाचपाऊली 150 बेड्सची क्षमता
- नागपूर मनपाचे 2 डेडिकेटेड कोविड केयर हेल्थ सेन्टर (DCHC)
- आयसोलेशन hospital 35 बेड्स
- इंदिरा गांधी महापालिका हॉस्पिटल 110 बेड्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)