एक्स्प्लोर

Nagpur Goa Flight : आठवड्यातून सहा दिवस नागपूर- गोवा विमानसेवा; जाणून घ्या वेळापत्रक...

विमान सायंकाळी 5.50 वाजता नागपुरातून गोवाकडे रवाना होईल. तर गोवा- नागपूर हे विमान दुपारी 3.55 वाजता टेक ऑफ केल्यानंतर सायंकाळी नागपुरात 5.20 वाजता पोहोचेल. बुधवार वगळता सर्व दिवशी सेवा उपलब्ध राहील.

Nagpur Goa Flight : न्यू गोवा विमानतळाच्या (मोपा) Mopa International Airport शुभारंभानंतर अनेक विमानांचे संचालन सुरु झाले आहे. फेब्रुवारी 2023 पासून गो फर्स्ट विमान कंपनी नागपूर-गोवा-नागपूरकरता विमानसेवा सुरु करणार आहे. गो फर्स्टचे 8-955 विमान 1 फेब्रुवारीपासून सायंकाळी 5.50 वाजता नागपुरातून गोवाकडे रवाना होईल. हे विमान दरदिवशी राहिल. तर जी 8-954 गोवा-नागपूर हे विमान दुपारी 3.55 वाजता टेक ऑफ केल्यानंतर सायंकाळी नागपुरात 5.20 वाजता पोहोचेल. हे आठवड्यात बुधवार वगळता सर्व दिवशी उपलब्ध राहील.

गो फर्स्टने घरगुती विमानसेवा वाढवण्यासाठी गोव्याच्या मनोहर विमानतळावरुन 42 नवीन उड्डाणांची घोषणा केली आहे. यानुसार 5 जानेवारीपासून मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादकरता नवीन विमान सुरु करणार आहे.

गो फर्स्टची घरगुती विमानसेवा

विमानांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी गोव्याच्या मनोहर विमानतळावरुन 42 नवीन उड्डाणांची घोषणा केली आहे. यानुसार 9 जानेवारीपासून मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादकरता नवीन विमान सुरु करणार आहे. कंपनी सध्या 65 विमानांचे संचालन करते. कंपनीने 55 नवीन विमाने घेतली आहेत. या कारणामुळे पुढील दोन महिन्यांत 100 उड्डाणांची संख्या पार करु शकते. न्यू गोवा विमानतळाचा विकास जीएमआर, हैदराबादने केला आहे.

महिन्याभरात शंभराहून अधिक चार्टर्ड फ्लाईटचे लॅंडिंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वर्षांपूर्वीपर्यंत वर्षभरात जेवढी चार्टर्ड विमानं पोहोचत होती तेवढी विमानं या वर्षी डिसेंबर महिन्यात पोहोचत आहेत. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत नागपूर विमानतळावर डिसेंबर महिन्यात शंभरपेक्षा जास्त चार्टर्ड फ्लाईटचे लॅंडिंग नागपुरात झाले आहे. दोन वर्षांनंतर नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक व्हीआयपी चार्टर्ड विमानांनी उपराजधानीत येत आहेत. याशिवाय काही इतर चार्टर्ड विमानांचे संचालनही झाले आहे. सूत्रांनुसार डिसेंबर महिन्यात आतापर्यंत शंभराहून अधिक विमानांची ये-जा झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान लहान असले तरी यात व्हीआयपी व्यक्ती असतात. या कारणामुळे विमानतळावर पूर्वीच्या तुलनेत गर्दी पाहावयास मिळत आहे. आपल्या नेत्याला घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. सध्या राष्ट्रीय व्यावसायिक विमान आणि चार्टर्ड विमानातील प्रवाशांना कोरोनाच्या रॅंडम टेस्टिंगची गरज नसल्याचीही माहिती आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेत्यांसाठी गोळा होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी करण्यासाठी लवकरच प्रयत्न होऊ शकतो.

आरोग्य अधिकारी म्हणतात...

नव्या निर्देशांनुसार आंतरराष्ट्रीय विमानांच्या दोन टक्के प्रवाशांची रँडम कोरोना तपासणीसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक विमानतळावर तैनात करण्यात आले आहेत. शासनाचे निर्देश येताच हे पथक तैनात असून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. 

ही बातमी देखील वाचा...

मिहानमधील दसॉल्ट-रिलायन्सच्या संयंत्रात राफेलच्या स्पेअरपार्टची निर्मिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hour Guest Center : अमित शाह 90 मिनिटांच्या भाषणात त्या 12 सेकंदात काय बोलले?Zero Hour on Chhagan Bhujbal : शांत होणार की पक्ष सोडणार? छगन भुजबळांसमोर पर्याय कोणता?Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Embed widget