एक्स्प्लोर

Mihan Nagpur : मिहानमधील दसॉल्ट-रिलायन्सच्या संयंत्रात राफेलच्या स्पेअरपार्टची निर्मिती

Mihan मधील कंपन्यांकडून निर्यात केली जात असून राफेल जेटसाठी उपयुक्त स्पेअरपार्ट येथे तयार करुन फ्रान्सला पाठविण्यात येत असल्याची माहिती फ्रान्सचे महावाणिज्य दूत जीन मार्क सेरे शार्लेट यांनी  दिली.

Reliance Aerospace Manufacturing Facility in Mihan Nagpur : मिहान (Mihan) स्थित दसॉल्ट रिलायन्स एयरोस्पेसच्या संयंत्रात राफेल लढाऊ विमानांच्या (Dassault Rafale) पाच स्पेअरपार्टची निर्मिती केली जात आहे. यात फायटर जेटच्या ट्विन इंजिनला संरक्षण देणारे दरवाजे नागपूर येथील प्रकल्पात तयार करण्यात आले आहेत. निर्मितीनंतर हे स्पेअरपार्ट राफेलमध्ये असेंबलीकरता फ्रान्सला पाठवले जात आहे, अशी माहिती फ्रान्सचे महावाणिज्यदूत जेन मार्क सेरे शेवरले यांनी मुंबईत दिली. 

मुंबईतील फ्रान्सचे कौन्सुलेट जनरल जेन मार्क सेरे शेवरले यांच्या नेतृत्वातील फ्रान्स दूतावासाच्या प्रादेशिक आर्थिक सेवा शिष्टमंडळाने अलीकडेच दोन दिवसीय दौरा केला. त्याअंतर्गत डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड आणि एअर लिक्विड या दोन फ्रान्सच्या कंपन्यांना भेट देण्यात आली. याबाबत अधिक सांगताना कौन्सुलेट जनरल जेन मार्क सेरे शेवरले म्हणाले, "राफेलचे पाच भाग नागपुरात तयार केले जातात. त्यानंतर ते सर्व राफेल जेटमध्ये असेम्बल करण्यासाठी फ्रान्स येथील असेम्ब्ली लाईनला पाठवण्यात येतात. केवळ भारतीयच नव्हे तर सर्वप्रकारच्या राफेलमध्ये मिहान येथे बनवण्यात आलेल्या सुट्या भागांचा समावेश आहे. फाल्कन 2000 जेटचे वेगवेगळे भाग देखील येथे बनत आहेत."

केंद्र सरकारने फ्रान्ससोबत 58 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यातून भारताला 36 लढाऊ विमाने देण्यात येणार आहेत. तीन वर्षांपूर्वी फ्रान्सने पहिले राफेल दिले होते. त्यानंतर आता चीनच्या वाढत्या कुरापतीच्या पार्श्वभूमीवर शेवटचे विमानही भारतात दाखल झाले आहे.

मेट्रोसाठी 130 दशलक्ष युरोंचे साहाय्य

भारत आणि फ्रान्समधील व्यापार, गुंतवणूक, संरक्षण-सुरक्षा, ऊर्जा, शिक्षण या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. फ्रान्स येथील एजन्स फ्रॅन्साइज डेव्हलपमेंटने वीस वर्षांच्या क्रेडिट कालावधीसाठी 130 दशलक्ष युरोचे आर्थिक साहाय्य नागपूर मेट्रोसाठी केले आहे. पुणे आणि गुजरातमधील इतर मेट्रो प्रकल्पांमध्येही एजन्स फ्रॅन्साइज डेव्हलपमेंट सक्रिय असल्याची माहिती जनरल जेन मार्क सेरे शेवरले यांनी दिली.

मिहानमध्ये एअर लिक्विडचा प्रकल्प सुरु

फ्रान्सची कंपनी असलेल्या एअर लिक्वाडच्या नवीन ऑक्सिजन प्लान्ट (Oxygen Plant) आणि सिलिंडर फिलिंग स्टेशनचे अलीकडेच उद्घाटन झाले. 120 कोटींच्या गुंतवणुकीसह सात एकर क्षेत्रामध्ये पसरलेल्या या अत्याधुनिक उत्पादन सुविधेमुळे दर्जेदार औद्योगिक गॅस उत्पादनांची स्थानिक मागणी पूर्ण होणार आहे. ऑक्टोबरपासून हा कारखाना कार्यान्वित आहे. एअर लिक्वाइड ही कंपनी भारतभरातील औद्योगिक युनिट आणि रुग्णालयांना सुविधा प्रदान करत असल्याचीही माहिती यावेळी त्यांनी दिली.

ही बातमी देखील वाचा

मुख्यमंत्र्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनीसंदर्भात वादग्रस्त आदेश मागे तर घेतला, पण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget