Ajit Pawar: "अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो"
आमच्या जागा वाढवण्यासाठी राज्यभर दौरे करतोय, असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत सातत्याने नवनव्या बातम्या येत असतात. कधी त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असतात, तर कधी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चा होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा अजित पवारांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी केली जातेय. आता पुन्हा राज्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram)यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो, असे वक्तव्य केले आहे. आत्राम यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. तसेच आमच्या जागा वाढवण्यासाठी राज्यभर दौरे करतोय, असंही ते म्हणालेत.
देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ महाराष्ट्र भाजपनं ट्विट केल्यानं राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. मी पुन्हा येईन या संदेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तासाभरानंतर ट्वीट डीलिट करण्यात आले आहे. याविषयी बोलताना आत्राम म्हणाले, भाजपने पुन्हा येईल वाले ट्वीट मागे घेतले आहे. त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही. मात्र अजित दादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. राज्यात जागा वाढवण्यासाठी राज्यभर फिरत आहे. तसेच भाजपने पुन्हा येईनचं ट्विट मागे घेतलंय, त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
अजित पवार लवकरच विदर्भ दौऱ्यावर
आत्राम म्हणाले, अजित पवार लवकरच विदर्भाचा दौरा करणार आहे. जास्तीत जास्त जागा मिळव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीकोनातून आम्ही कामाला सुरूवात केले आहे. अजित पवारांचा प्रशासनावर चांगला वचक आहे त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या दृष्टीकोनातून तयारी सुरू झाली आहे.
फडणवीस पुन्हा स्टेअरिंग हातात घेणार का?
देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. त्यामुळे भाजपच्या या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात दावे प्रतिदाव्यांचा संगम सुरु झाला आहे. शिंदे गटावरील अपात्रतेची टांगती तलवार, महायुतीतील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा, अजित पवार नाराज असल्याची चर्चा, अजितदादांच्या आक्रमकतेची धार कमी करणं, भाजपच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद देणं ही कारणं असण्याची चर्चा नाकारता येत नाही. तर भाजपच्या या जुन्या व्हिडीओमुळे नवे प्रश्न उपस्थित झालेत. महाराष्ट्रात सत्तेच्या तीनचाकी रिक्षात, अजितदादांना सोबत घेऊन, मागे बसलेले फडणवीस पुन्हा स्टेअरिंग हातात घेणार का? अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
हे ही वाचा :