(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : मनपाचे अग्निशमन विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर; 63 फायरमनची कंत्राटी पदभरती
महानगपालिकेच्या दृष्टीने महत्वाच्या विभागांपैकी अग्निशमन विभाग सुद्धा एक महत्त्वाचा विभाग आहे. विभागाच्या बळकटीकरणाकडे पालिकेच्या प्रशासनाने सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिलेले नसल्याचे दिसून येत आहे.
नागपूरः नागपूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महानगरपालिकेचा अग्निशमन विभागात 63 फायरमनची कंत्राटी पद्धतीवर विभागात नव्याने पदभरती करणार आहे. या विभागातील निम्मी पदे रिक्त आहेत. सरकारने नव्या आकृतिबंधाला आणि सेवाभरती नियमाला मंजुरी दिली असली, तरी पालिकेच्या प्रशासनाने रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
महानगपालिकेच्या दृष्टीने महत्वाच्या विभागांपैकी अग्निशमन विभाग सुद्धा एक महत्त्वाचा विभाग आहे. विभागाच्या बळकटीकरणाकडे पालिकेच्या प्रशासनाने सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिलेले नाही. त्यामुळे जैसे थे स्थितीत या विभागाचा काम सुरु आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या विभागासाठी मंजूर पदांची संख्या 834 आहे. परंतु ही संख्या 13 अग्निशमन केंद्रासाठी आहे. सध्या मनपाकडे 9 अग्निशमन केंद्र आहेत. त्यात मुख्य अग्निशमन अदिकारी, स्टेशन ऑफिसर, उप अग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशामक, ड्रायव्हर ऑपरेटर, वाहनचालक, अग्निशामक, टेलिफोन ऑपरेटर, मोटर फिटर, शिपाई-मजूर या पदांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेत 63 फायरमन कंत्राटी पद्धतीवर अग्निशमन विभागात कार्यरत झाले आहेत. या फायरमनला अंबाझरी तलावात बोटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
रोस्टर ठरले नसल्यामुळे नोकरभरती रखडली
राज्य सरकारने महानगरपालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर केला, सेवाभरती नियमांनाही मंजुरी दिली. या निर्णयाला वर्ष उलटून गेले, अद्याप प्रशासनाने नोकर भरती केली नाही. नोकर भरतीसाठी रोस्टरचे कारण पुढे केले जात आहे. नोकरभरतीमधील आरक्षणासाठी रोस्टर ठरले नसल्यामुळे नोकर भरती रखडली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या