एक्स्प्लोर

Nagpur Crime : न्यायालयाची फसवणूक करणाऱ्यांसोबत पोलिसांची पार्टी!

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र आरोपींना पोलिसांकडून स्पेशल ट्रिटमेंट देण्यात येत आहे. पोलिस आयुक्तांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांना फटकारले असल्याचे कळते.

नागपूरः बनावट कागदपत्रांच्या आधारे गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देणाऱ्या टोळीने गुन्हे शाखेच्या कार्यालयात दारू-कबाब पार्टी साजरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या सतर्कतेने ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी एका अधिकाऱ्याची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या कारवाईने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

गुन्हे शाखेने या रॅकेटचा पर्दाफाश करून यात सहभागी असलेल्या चार आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. हे आरोपी तुरुंगात आहेत. पार्टीची घटना गेल्या आठवड्यात घडली. सेमिनरी हिल्स येथील गुन्हे शाखेचे युनिट-2 या प्रकरणाचा तपास करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अधिकारी आणि जवानांसोबत पार्टी आयोजित केली होती. आरोपींच्या हिंतचिंतकांनी पार्टीसाठी साहित्याची व्यवस्था केली. संध्याकाळनंतर आरोपी, त्याचे साथीदार आणि युनिट-2 मधील काही कर्मचाऱ्यांनी पार्टी साजरी केल्याचे सांगण्यात येते. रात्री बाहेरील लोकांची हालचाल नसल्याने पार्टीबाबत कोणालाच माहिती मिळू शकली नाही. कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची खात्री युनिट-2 चे अधिकारी व कर्मचारीदेखील निश्चित होते.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडीत यांना या पार्टीची माहिती मिळाली. त्यांनी युनिट-2च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडसावले. नियंत्रण कक्षात पाठवलेल्या अधिकाऱ्याला विनाकारण शिक्षा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ज्याच्या संमतीने हा कारभार झाला त्या अधिकाऱ्यावर देखील कठोर कारवाई अपेक्षित होती. न्यायालयाची फसवणूक करून गुन्हेगारांना मदत करणाऱ्या आरोपींना चांगल्या कोठडीची सुविधा आणि पार्टीची परवानगी देणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. दोषींवर कठोर कारवाई करुनच योग्य संदेश दिला जाऊ शकतो.

मटका किंगतर्फे सत्कार!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटाळा येथील कुख्यात मटका किंग समजल्या जाणाऱ्याने दोन महिन्यांपूर्वी परिसरात सार्वजनिक भोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात युनिट-2 च्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला होता. याचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले

महत्त्वाच्या बातम्या

Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget