एक्स्प्लोर

Mumbai Bank Scam : प्रवीण दरेकर यांची आज पुन्हा चौकशी, सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बँक मजूर प्रकरणात दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. यापूर्वी 4 एप्रिल रोजी प्रवीण दरेकर यांची याच प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली होती.

मुंबई : मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. आज (11 एप्रिल) सकाळी अकरा वाजता मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. यापूर्वी मागील आठवड्यात सोमवारी म्हणजेच 4 एप्रिल रोजी प्रवीण दरेकर यांची याच प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांची चौकशी होत आहे.

मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.

यापूर्वीच्या चौकशीत काय झालं?
4 एप्रिल रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता सुरु झालेली चौकशी दुपारी 3 वाजता संपली. "पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. पण पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं," अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसंच पोलिसांनी अनेक वेळा उलटसुलट आणि तेच तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. शिवाय चौकशी सुरु असताना पोलीस अधिकाऱ्यांना सहा-सात वेळा फोन आले, पण कोणाचे फोन आले ते कळलं नाही, असंही दरेकर यांनी म्हटलं होतं. 

काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget