एक्स्प्लोर

Mumbai Bank Scam : पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव प्रत्येक क्षणी जाणवत होतं : प्रवीण दरेकर

मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली.

मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी संपली आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली. "पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. पण पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं," अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली. दुपारी 12 वाजता सुरु झालेली चौकशी दुपारी 3 वाजता संपली.

मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. प्रवीण दरेकर यांना आज (4 एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली.

चौकशीबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, "सभासद म्हणून बँकेकडून काही लाभ घेतला का, अशाप्रकारचे गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न तीन तासात विचारण्यात आले. पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. अनेक वेळा उलटसुलट आणि तेच तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. ज्याची नियत साफ आहे, त्यांच्यावर अशाप्रकारच्या गोष्टीचा परिणाम होत नाही. अत्यंत मुद्देसूद, तपशीलवार जे जे विचारलं त्याची उत्तरं दिली."

नियमबाह्य प्रश्न विचारले : प्रवीण दरेकर
पोलिसांनी बरेचसे नियमबाह्य प्रश्न देखील विचारले, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. ते म्हणाले की, "हा गुन्हा एका संस्थेपुरताच मर्यादित असताना इतर सस्था, राज्यस्तरीय फेडरेशन, बँक आणि अनेक विषयासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला."

'चौकशीदरम्यान पोलिसांना 6-7 वेळा फोन'
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, "चौकशीदरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त स्वत: तिथे मॉनिटर करत होते. त्यांचा दबाव असल्याचं स्पष्ट दिसत होतं. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली, त्यांनी आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावलं. माझ्याकडे असलेली माहिती मी त्यांना दिली. चौकशी सुरु असताना पोलीस अधिकाऱ्यांना सहा-सात वेळा फोन आला, पण कोणाचे फोन आले ते कळलं नाही. आवश्यकता भासल्यास  पुन्हा बोलावू असं सांगितलं आहे. पुन्हा बोलावलं तर मी त्या ठिकाणी उपलब्ध होईन. पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं."

काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : 'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar PC FULL : आम्ही सर्वांना सोबत घेऊन निवडणुका जिंकू, आशिष शेलारांना विश्वासAhmednagar Nilesh Lanke Banner : अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या कार्यालयासमोर इंग्रजीतून बॅनरABP Majha Headlines :  2:00PM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde : महिलांनी शिंदेंना ओवाळलं, राखी बांधली; लाडकी बहिण योजनेसाठी मानले आभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : 'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
Kalki 2898 AD Movie Review :   कल्की 2898  एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
कल्की 2898 एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
Web Series Release On OTT In July :  जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
Maharashtra Budget Session 2024: अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Embed widget