एक्स्प्लोर
विरार स्टेशनवर किकी डान्स स्टंटबाजी करणाऱ्या तिघांना अटक
यूट्यूबवरील लोकेशनच्या आधारे तिघा तरुणांना आरपीएफने अटक केली.
विरार : विरार रेल्वे स्थानकात धावत्या लोकलसमोर प्लॅटफॉर्मवर 'किकी डान्स' करणाऱ्या तिघा तरुणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरपीएफ पोलिसांनी यूट्यूब व्हिडिओवरुन तरुणांवर कारवाई केली.
विरार रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एका तरुणाने धावत्या लोकलसमोर किकी डान्स केला, तर त्याच्या दोघा मित्रांनी धावत्या लोकलमधून तो शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ त्यांनी यूट्यूबवर अपलोड केला होता.
यूट्यूबवरील लोकेशनच्या आधारे तिघा तरुणांना आरपीएफने अटक केली. 20 वर्षीय निशांत राजेंद्र शहा, ध्रुव अनिल शहा आणि 24 वर्षीय श्याम राजकुमार शर्मा असं किकी डान्सवर स्टंट करणाऱ्या तिघांची नावं असून हे तिघंही विरार पश्चिमकडे राहणारे आहेत.
काहीच दिवसांपूर्वी एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर किकी डान्सचा व्हिडीओ चित्रित केला होता. 30 जुलैला युट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड झाला होता. या तरुणाने चालत्या लोकलबाहेर डान्स केला असला तरी इतरांनी तसला मूर्खपणा न करण्याचं आवाहन रेल्वे पोलिसांनी करुनही त्याचं अनुकरण होताना दिसत आहे.
काय आहे किकी चॅलेंज?
'किकी, डू यू लव्ह मी? आर यू रायडिंग?' असे ड्रेक- इन माय फीलिंग या 'किकी' गाण्याचे शब्द आहेत. चालत्या गाडीतून उडी मारायची आणि चालत असलेल्या गाडीच्याच वेगाने गाण्यावर नाचत चालायचं, असं या चॅलेंजचं स्वरुप आहे. सोशल मीडियावर सध्या 'किकी चॅलेंज' चांगलंच ट्रेण्डिंगमध्ये आहे.
हा धोकादायक चॅलेंज फॉलो करताना तु्म्ही स्वतःचा जीव तर धोक्यात टाकताच पण इतरांच्या जीवाशीही खेळता. त्यामुळेच जाणकारांनी या चॅलेंजच्या नादी न लागण्याचं आवाहन तरुणांना केलं आहे. आतापर्यंत जगभरातील अनेक तरुण किकी चॅलेंज करताना अपघातग्रस्त झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement