ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा पाणी कपात नाही
ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंदर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने ठाणेकरांची यंदाच्या वर्षासाठी पाण्याची चिंता मिटणार आहे.
ठाणे : मागील काही वर्षे ठाणे जिल्हयातील (Thane District) शहरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागत आहे, मात्र यंदा पावसाळा डिसेंबर महिन्यापर्यंत लांबल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंदर धरणात पुरेसा पाणीसाठा (Water Issue) आहे. त्यामुळे यंदा पाणी कपात करावी लागणार नसल्याचं पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ शहरांमध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. या सर्व शहरांना पाणीपुरवठा करणारे बारवी हे एकमेव धरण आहे. मात्र पाणी गळती आणि पाणी चोरीमुळे 35 टक्के पाणी वाया जाते. पाणी उचल करणाऱ्या यंत्रणा पुरेशा सक्षम नसल्याने क्षमतेपेक्षा कमी पाणी उचलले जाते. अनेक शहरांमध्ये पाण्याचे सुयोग्य वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या टाक्या अद्याप उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित यंत्रणांना मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ साधण्यासाठी 15 टक्के पाणी कपात करावी लागते. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पाणी पुरवठ्याचे नियोजन ठरते. आधीच बारवी धरणाची उंची वाढवण्यात आल्याने पाणीसाठा वाढला आहे, त्यात यंदा पावसाळा तीन महिने लांबल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही पाऊस पडला. 1 डिसेंबर रोजी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात भर पडली. त्यामुळे यंदा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल, इतका पाणीसाठा धरणात असल्याने कपात करावी लागणार नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maharashtra Coronavirus Lockdown : राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितला ठाकरे सरकारचा निर्णय
- Lockdown : भारतात तिसऱ्या लाटेचं तांडव? जानेवारी महिन्यात पीक पॉईंट ; शास्त्रज्ञांचा अंदाज
- परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई, BMC चा मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह