एक्स्प्लोर

नारायण राणेंच्या राज्यसभा उमेदवारीस शिवसेनेचा आक्षेप

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला आता शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला आता शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. भाजपनं महाराष्ट्रातून आपल्या कोट्यातील तीन जागांपैकी एका जागेसाठी नारायण राणेंना पुढे केलं आहे. मात्र, अर्जात राणेंनी कोणत्या पक्षाचं नाव लिहिलं आहे?. ते भाजपनं जाहीर करावं असं आव्हानंच शिवसेना नेते अनिल परब यांनी दिलं आहे. परब इथेच थांबले नसून त्यांनी राणेंनी भाजपचं सदस्यत्व कधी स्वीकारलं, त्याची पावती आहे का? असे अनेक अडचणीचे प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेनं राणे आणि भाजपची चांगलीच गोची झाली आहे. अनिल परब यांनी उपस्थित केलेले मुद्दे : - नारायण राणे यानी कोणाच्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला? - भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यांनी भाजपचे सदस्यत्व कधी स्वीकारले? त्याची काही पावती, इ मेल? - नेमकं कोणत्या मार्गाने त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले? - जर नारायण राणे यांनी सदस्यत्व स्वीकारले असेल तर त्यांनी त्यांच्या स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला का? - एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही. - जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी आपल्या पक्षाचा अधिकृत सदस्य करुन घ्यावा लागतलो. तरच त्याला पक्षाला बी फॉर्म देता येतो. असे नियम आहेत. असे सवाल करत शिवसेना आमदार अनिल परब यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित बातम्या : राणेंना राज्यसभेची ऑफर आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी शिवसेनेच्या भीतीने राणेंना राज्यसभेची ऑफर : रामदास आठवले नारायण राणेंना भाजपची ऑफर अमान्य? राज्यसभेसाठी भाजपची महाराष्ट्रातून राणेंसह 3 नावं निश्चित : सूत्र मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर: नारायण राणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget