एक्स्प्लोर
शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला वैद्यकीय कारणांसाठी जामीन देण्यास हायकोर्टाचा तूर्तास नकार
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीचा हा सहावा जामीन अर्ज आहे. विशेष सीबीआय कोर्टानं वैद्यकीय कारणांसाठी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं पीटरनं याच कारणासाठी आता हायकोर्टात अर्ज केला आहे.
![शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला वैद्यकीय कारणांसाठी जामीन देण्यास हायकोर्टाचा तूर्तास नकार Sheena Bora Murder case - High court Rejected Peter Mukharjee bail शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला वैद्यकीय कारणांसाठी जामीन देण्यास हायकोर्टाचा तूर्तास नकार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/18221604/Peter-Mukherjea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर करण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. मात्र तब्येतीची नियमित तपासणी करण्यासाठी पीटरला बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये पोलीसांसोबत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावरील सुनावणी 12 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली असून पुढील सुनावणीपर्यंत 26 नियमित तपासण्या पोलीस संरक्षणात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी यावर सुनावणी झाली. या सुनावणीत सीबीआयनं पीटरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीचा हा सहावा जामीन अर्ज आहे. विशेष सीबीआय कोर्टानं वैद्यकीय कारणांसाठी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं पीटरनं याच कारणासाठी आता हायकोर्टात अर्ज केला आहे. त्याचबरोबर तपासयंत्रणेकडे आपल्याविरोधात सढळ पुरावे नाहीत, असा पीटरचा दावा अजूनही कायम आहे. पीटर मुखर्जीला 16 मार्चला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर कोर्टाच्या संमतीने त्याला शस्त्रक्रियेसाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले होते.
काय आहे प्रकरण
शीना बोराची हत्या 2012 मध्ये करण्यात आली. तिची आई इंद्राणी मुखर्जीनं, तिचा आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्या मदतीने शीनाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली. शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची बहिण नसून मुलगी आहे हे सत्य पीटरला ठाऊक होते. तसेच पीटरला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा राहुल आणि शीनाचे प्रेमसंबंध जुळले आहेत ही बाबही त्याला ठाऊक होती, अशी माहिती सीबीआयनं कोर्टाला दिली आहे. तसेच शीना बोराचा शोध घेण्यासाठी पीटरने कोणतीही पावलं उचलली नाहीत असाही सीबीआयचा दावा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)