Corona Test | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता रॅपीड टेस्ट; अवघ्या पाच मिनिटात कोरोना चाचणी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार आता रॅपीड कोरोना टेस्ट घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीला ओळखणं महत्वाचं आहे. राज्यात दररोज केवळ पाच हजार टेस्ट करण्याची क्षमता आहे. कोरोनाच्या या तपासण्यांना वेग येण्यासाठी राज्य सरकारनं नवं पाऊल उचललं आहे. राज्यात आता वेगाने कोरोनाची चाचणी घेण्यासाठी रॅपीड कोरोना टेस्ट करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात आता मोठ्या प्रमाणात रॅपीड टेस्ट होणार आहे. यात केवळ पाच मिनिटात कोरोना चाचणी होणार आहे. राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा वाढत असून सध्या 690 कोरोनाबाधित आहेत.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कोरोनाइतकंच जलद गतीनं त्याच्याशी लढावं लागणार आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण ओळखण्यातच वेळ खर्ची पडला तर मात्र कोरोनाची ताकद वाढेल. हे ओळखूनच कोरोनाच्या तपासण्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. रॅपीड टेस्टिंग हा त्यापैकीच एक प्रयोग आहे. रॅपीड टेस्ट किट हे कोरोनाचं निदान करण्यासाठी पाच ते 10 मिनिटं घेते. हे किट मिळाल्यानंतर व्यक्तीने आपले बोट निर्जंतुकीकरण करुन त्यातून रक्त घेण्यासाठी किटसोबत दिलेल्या लँसेटचा वापर करावा. सोबत दिलेले कार्ट्रिज रक्ताच्या नमून्याची तपासणी करते आणि अशा प्रकारे पाच ते 10 मिनिटात तपासणीचा निकाल मिळतो. हे किट वापरायला अगदी सोपे असून काही मिनिटातच आजाराचे निदान होते.
coronavirus | पुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी, मृतांची संख्या पाचवर
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्वाची रॅपीड टेस्टमुळे रुग्णांच्या संख्येचा अंदाज आपल्याला येईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनावर उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष रुग्णालयेही तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी आम्ही घेत आहोत. त्यासाठी त्यांना लागणारे सर्व साहित्य मिळावे यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं असल्याचंही टोपे यांनी सांगितले.
Coronavirus | देशात कोरोना बाधितांचा आकडा 2787वर; आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू
रॅपीड टेस्टींग किटची भूमिक महत्वाची या प्राणघातक विषाणूची वेळेतच तपासणी करण्यात हे किट प्रभावी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. बायोन कंपनीद्वारे असं रॅपीड टेस्टींग किट तयार करण्यात आलं आहे. आतापर्यंत दिवसाला दोन हजार टेस्ट महाराष्ट्रात केल्या जाऊ शकतात. मात्र, या टेस्टची संख्या वाढवणं गरजेचं आहे. जितक्या तपासण्या जास्त तितके कोरोनाचे रुग्ण ओळखणं सोपं आणि तितकंच कोरोनावर मात करणंही सोपं होईल. त्यामुळे या रॅपीड टेस्टींगचा योग्य वापर होऊन त्याचे योग्य परिणाम दिसले तर कोरोनाला आपण लवकरच मात देऊ यात शंका नाही.
Coronavirus | डोबिवलीत कोरानाचे आणखी चार रुग्ण आढळले