एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला खाजगी कंपन्यांकडून केराची टोपली, अजूनही लोकलला तुडूंब गर्दी

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला खाजगी कंपन्यांकडून केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. कारण, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलेले नसल्याने अजूनही लोकलच्या प्रवाशांची संख्या आधी इतकीच आहे.

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी आवाहन करून देखील अनेक खाजगी कंपन्यांनी अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलेले नाही. त्यामुळे अजूनही लोकल रेल्वेच्या प्रवाशांची संख्या आधी इतकीच बघायला मिळते आहे. असे असल्यास कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी कशी होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासगी आणि सरकारी कंपन्यांना कमीत कमी कर्मचारी ऑफिसमध्ये बोलवण्याचा सल्ला दिला. केवळ पन्नास टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवावे किंवा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. 

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला खाजगी कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरकारने स्पष्ट निर्देश दिले असताना देखील खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केलेली नाही. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे लोकल मधील प्रवाशांची संख्या. खरेतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रवासी संख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र, संख्या तितकीच आहे जितकी मार्च महिन्यामध्ये होती. 

दर दिवशी मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी 

  • जानेवारी महिन्यात जेव्हा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते - दररोज अंदाजे 13 लाख प्रवासी. 
  • फेब्रुवारी महिन्यात जेव्हा कालमर्यादा ठरवून सर्वांना मुभा देण्यात आली - दररोज अंदाजे 16 ते 17 लाख प्रवासी 
  • मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात - दररोज तब्बल 20 लाख प्रवासी 
  • मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी - दररोज 20 ते 21 लाख प्रवासी 
  • 1 एप्रिलला - अंदाजे 21 लाख प्रवासी. 

दर दिवशी पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आकडेवारी 

  • जानेवारी महिन्यात जेव्हा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते - दररोज अंदाजे 10 लाख प्रवासी, 
  • फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काल मर्यादा ठरवून सर्वांना मुभा देण्यात आली - दररोज अंदाजे 16 लाख प्रवासी 
  • मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात - दररोज अंदाजे तब्बल 17 लाख प्रवासी 
  • मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी - दररोज 16 ते 17 लाख प्रवासी 
  • 1 एप्रिलला - अंदाजे 16 लाख प्रवासी

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की प्रवाशांच्या संख्येत कुठेही कमी झालेली नाही. म्हणजेच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमसारखे पर्याय अजूनही सुरु केलेले नाहीत. अनेक कर्मचाऱ्यांनी मागणी करून देखील कंपन्या ही मागणी ऐकायला तयार नाहीत. 

मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये कोविड 19 रुग्णांची संख्या वाढल्याचे महत्त्वाचे कारण लोकल मधील प्रवाशांची वाढलेली संख्या असे सांगण्यात आले. मात्र, खाजगी कंपन्यांनी जर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केलीच नाही तर लोकल मधील प्रवासी संख्या देखील कमी होणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हा काय होतं; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राजकारण, महायुतीला किती जागा?
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Embed widget