एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार : प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Ghatkopar Hoarding : पंतप्रधान मोदींच्या रोड शोपासून राजावाजी रुग्णालय हे 10 मिनिटांच्या अंतरावर होते, पण मोदींनी तिकडे भेट न देता आपला रोड शो सुरू ठेवला असा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

मुंबई : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित असून ती हत्येपेक्षा कमी नाही. या हत्यांना BMC शिवाय इतर कोणीही जबाबदार नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. घाटकोपरमध्ये भलामोठा होर्डिंग कोसळून त्यामध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण जमखी झाले आहेत. 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 

या मानवनिर्मित दुर्घटनेतील पीडितांमध्ये दोन रिक्षाचालक, एक कॅब ड्रायव्हर, एक टूरिस्ट ड्रायव्हर, एक डिलिव्हरी बॉय आणि एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा समावेश आहे असं सांगत ॲड. आंबेडकर म्हणाले की, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना मुख्यमंत्र्यांनी मदत म्हणून केवळ पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते; यामध्ये काही महाराष्ट्रातील तर काही महाराष्ट्राबाहेरचे होते. ते सर्वजण आपलं घरदार सोडून चांगले जीवन जगण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईत आले होते.

पाच लाख रुपयांमध्ये त्यांची नुकसान भरपाई कशी करणार किंवा मुलांचे भविष्य कसे सुरक्षित करणार? त्यांचा जोडीदार आणि आई-वडील त्यांच्यावर अवलंबून होते का? ते जगणार कसे? असे सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केले.

नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आंबेडकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी पीडित आणि जखमींबाबत किती निर्दयी वागले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. राजावाडी रुग्णालय, (घाटकोपर) जेथे जखमींना दाखल करण्यात आले होते, ते मोदींच्या रोड शोपासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर होते. पण मोदींसाठी त्यांचा रोड शो अधिक प्रिय होता.

होर्डिंग कोसळला त्या ठिकाणी मी भेट दिली होती, तेव्हा मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती असे सांगून आंबेडकर यांनी आज त्या मागणीचा पुन्हा उल्लेख केला.

घाटकोपर दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेला वर्ग

घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर झालेल्या दुर्घटना प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (51) याला उदयपूर येथून गुन्हे शाखेने अटक केली होती.  जाहिरात फलक कोसळल्यानंतर लगेचच भिंडे याने अटकेच्या भीतीने पळ काढला होता.

नवीन होर्डिंगना परवानगी नाही

मुंबईत कोणत्याही नवीन जाहिरात फलकांना तूर्तास परवानगी नाही असे आदेश पालिका आयुक्त भूषम गगराणी यांनी दिलेत. नागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देवून त्याचबरोबर शहराला बकालपणा येणार नाही अशा रितीनेच यापुढे जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget