Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या नातेवाईकाचे निधन
Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळला. सापडला.
Ghatkopar Hoarding Accident Kartik Aaryan : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगमुळे (Ghatkopar Hoarding Accident) 16 मुंबईकरांना नाहक प्राण गमावावे लागले. या घटनेने बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात कार्तिकच्या नातेवाईकांना प्राण गमवावे लागले. मुंबईत 13 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर असलेल्या मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळले. त्यात अनेक नागरीक त्याखाली अडकले. त्यातील काहींची सुखरुप सुटका झाली. तर काहींना प्राण गमवावे लागले. या अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. कार्तिक आर्यनचे मामा मनोज चंसोरिया हे माजी एअर ट्रॅफिक कंट्रोल जनरल मॅनेजर होते. हे दोघेही जबलपूर येथील सिव्हिल लाइन्सच्या मरियम चौकात वास्तव्य करत होते.
मिळालेल्या वृत्तानुसार, कार्तिकचे मामा-मामी हे कारने मुंबईत व्हिसाच्या कामासाठी आले होते. त्यांचा मुलगा यश हा अमेरिकेत वास्तव्य करत आहे. त्याला भेटण्यासाठी अमेरिकेत जायचे होते. मुंबईहून जबलपूरला जाताना कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी घाटकोपरच्या पेट्रोल पंपवर गेले होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला.
तीन दिवसानंतर मृतदेहाची ओळख पटली...
घटनास्थळी पोलिसांना दोन मृतदेह आढळले होते. घटनेच्या तीन दिवसानंतर मृतदेह सापडल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड झाले होते. अंगठीवरून मृतांची ओळख पटवण्यात आले. गुरुवारी कार्तिक आर्यनच्या मामा-मामींवर अंत्यसंस्कार पार पडले.
आई-बापाचं लोकेशन घाटकोपर दुर्घटनास्थळी
घाटकोपर या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मनोज हे या पेट्रोल पंपावर आले होते, त्याचवेळी होर्डिंग कोसळलं आणि मनोज आणि त्यांच्या पत्नी या ढिगाऱ्याखाली अडकल्या. त्यांचा मुलगा काल अमेरिकमधून वडिलांना फोन करत होता, मात्र वडिलांनी फोन न उचलल्याने मुलगा घाबरला आणि मुलाने त्याच्या मित्रांना फोन करून सांगितलं की, माझ्या वडिलांना काय झाले, बघा वडील फोन उचलत नाही, मग मुलाच्या मित्रांनी शोध मोहीम सुरू केली.
त्यांच्या मित्रांनी अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मनोज यांचा मोबाईल ट्रॅक केला. त्यानंतर मनोज यांचे लोकेशन या घाटकोपरच्या पेट्रोल पंप दाखवल्यावर पोलीस या घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाच्या मित्रांना कळवलं. नंतर मनोज यांचे लोकेशन गुगल मॅपवर सर्च केलं आणि त्यात अंतर बाय वॉक दाखवलं. त्यानंतर पोलिसांना लोकेशन दुर्घटनास्थाळी दाखवल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाचा जवानाला आपल्यासोबत घेऊन जाऊन मनोज यांचा मोबाईल ढिगाऱ्याखालून मिळाला.