एक्स्प्लोर

Mumbai Cruise Drugs Case : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईल यांना पोलीस संरक्षण

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांच्यावरुन आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू झाला आहे.

मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. ‘माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळं मला संरक्षण मिळावं अशी मागणी प्रभाकर साईल यांच्याकडून करण्यात येत होती. ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट करणाऱ्या प्रभाकर साईल यांच्यावरुन आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू झाला आहे.

साईल यांचे वकिल तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईल यांनी सहार पोलिसांकडे संपूर्ण स्टेटमेंट नोंदवलं आहे. सगळं रेकॉर्ड आहे. तसेच आम्ही एफिडेविट देखील दिला आहे. प्रभाकरला जीवाचा धोका आहे त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी मागणी आम्ही जॉईंट सीपींना केली होती त्यानुसार पोलीस प्रोटेक्शन देण्याचे त्यांनी मान्य केलं. आम्ही एनसीबी ने केलेल्या कारवाईच्या विरोधात आहोत. त्यामुळे एखाद्या संस्थेच्या विरोधात आम्ही जात आहोत तेव्हा लोकल पोलिसांमध्ये आम्ही या प्रकरणी गेलो आणि आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले असल्याचे साईल यांचे वकिल तुषार खंदारे म्हणाले.

नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडेंचा फ्रॉड इथून सुरु होतो, पहिल्या लग्नातील फोटोही व्हायरल 

काय म्हणाले होते साईल 

आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा क्रुझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी काल दिली होती.  एबीपी माझाशी बोलताना एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितलं होतं की, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.  सईल यांनी सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10-12 दिवस राहिलो, असं त्यांनी म्हटलं होतं.

समीरवानखेडेंकडून मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या बाहेर जो प्रकार सुरू आहे. त्याबाबत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.  न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. गुन्हा क्रमांक 94/21 बाबत चर्चा सुरू आहे. या गुन्ह्याबाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे.  अनेक पंचांची नावं उघड होत आहेत.  एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाला माहिती देण्यात आली.  या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये , कारवाईवर होऊ नये, यासाठी एनसीबीनं पाऊल उचललं आहे. 

Drugs Case : 'तुला काही होत नाही म्हणत समीर वानखेडेंनी माझ्याकडून ब्लँक कागदावर सह्या घेतल्या', पंच प्रभाकर साईल यांचा आरोप

मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जातंय- वानखेडे

मला वैयक्तिकरित्या काही जणांकडून लक्ष्य केलं जातंय, असंही वानखेडे यांनी कोर्टात सांगितलं आहे.  माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर सतत आरोप केले जात आहेत.  आजही माझे काही खाजगी फोटो लिक करण्यात आलेत. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही.  माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे, अशी साक्ष समीर वानखेडेंनी कोर्टापुढे दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Embed widget