एक्स्प्लोर
नवी मुंबईत एक कोटी जप्त, सर्व नोटा एक हजारच्या
नवी मुंबई : नवी मुंबईत एक कोटी रुपये रकमेच्या जुन्या हजारच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खारघर येथील व्यावसायिक, व्यापाऱ्यांची ही रक्कम असल्याचं समजतयं. पोलिसांच्या चौकशीनंतर या नोटा बँकेत बदलण्यासाठी नेल्या जात असल्याचं समोर आलं.
खारघर येथील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक असे चार जण एका आलिशान गाडीतून एक कोटी रुपये किमतीच्या बंदी असलेल्या नोटा घेऊन कोपरी येथे आले. पोलिसांनी याबाबतची माहिती अगोदरच मिळाली होती. गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये दोन बॅग भरून हजारच्या नोटा आढळून आल्या.
पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर या नोटा बदली करण्यासाठी आणल्या असल्याची मिळाली. पोलिसांनी आयकर अधिकाऱ्यांना पाचारण करून अधिक चौकशी सुरु केली आहे.
यामध्ये खारघर येथील बांधकाम व्यावसायिक प्रसाद पाटील, हरिश्चंद्र शिंदे, भायखळा येथील प्रमोद पाडळे आणि कपडे व्यापारी अक्षय जैन यांचा समावेश आहे.
या नोटा बदलून नवीन दोन हजारच्या नोटा घेण्यासाठी आपण आल्याचं चौघांनी पोलिसांनी सांगितलं. मात्र योग्य कागदपत्र सादर न करू शकल्याने पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल करून आयकर विभागामार्फत चौकशी सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement