एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींना 'चहावाला' म्हणण्यापेक्षा 'चहावाल्याचा मुलगा' म्हणा, पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींचा सल्ला

आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा 6 भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना 'चहावाला' म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल, तर त्यांना 'चहावल्याचा मुलगा' म्हणा, असं प्रल्हाद मोदी म्हणाले.

उल्हासनगर (अजय शर्मा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  'चहावाला' म्हणण्यापेक्षा 'चहावाल्याचा मुलगा' म्हणा, असं म्हणत खुद्द नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटे काढले. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. 

यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चायवाला' म्हणण्यापेक्षा 'चायवाले का बेटा' म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व 'चायवाले के बेटे' आहोत, असं ते म्हणाले. आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा 6 भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना 'चहावाला' म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल, तर त्यांना 'चहावल्याचा मुलगा' म्हणा, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. त्यामुळे प्रल्हाद मोदींनी चिमटा नेमका पत्रकारांना घेतला, की स्वतःला 'चहावाला' म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींनाच घेतला? अशी कुजबुज सभागृहात रंगली होती.

जीएसटी भरायला नकार द्या, मग ठाकरेच नव्हे, मोदीही तुमच्याकडे येतील, पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचं व्यापाऱ्यांना आवाहन

रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात?

रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना केलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. मागील दोन वर्षात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलंय. अशात सरकारी पातळीवरून कुठलीही मदत मिळत नसल्यानं आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेनं प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केलं होतं. 

या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या. तसंच केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची मागणी केली. उल्हासनगर शहर हे निर्वासितांचं शहर असून या शहराला सरकारनं विशेष निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर बोलताना रेफ्युजी म्हणून किती दिवस रडणार आहात? आता लढायला शिका, असं आवाहन प्रल्हाद मोदी यांनी केलं. 

... तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या

ते म्हणाले की, तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचं लक्ष वेधायचं असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग पहा, उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं वक्तव्य प्रल्हाद मोदी यांनी केलं. तर यानंतर आम्ही जीएसटी केंद्राला भरतो, त्यामुळे आम्ही केंद्रालाच जाब विचारणार, अशी भूमिका उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी स्पष्ट केली. 

लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल उल्हासनगरात अनेक व्यापाऱ्यांवर पँडेमिक ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले असून त्यामुळे महाराष्ट्रातही हे गुन्हे मागे घेतले जावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला उल्हासनगरमधील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर खुद्द पंतप्रधानांचे भाऊ येणार असल्यानं पोलिसांनी अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget