एक्स्प्लोर

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा

Munjya Actor Abhay Verma : 'मुंज्या' चित्रपटातीस अभिनेता अभय वर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्याने सुहाना खानचा 'द आर्चिज' चित्रपट नाकारला होता.

मुंबई : हॉररपट मुंज्याने (Munjya Movie) अलिकडे 100 कोटींच्या टप्पा पारा केला आहे. कोणतीही दिग्गज स्टारकास्ट नसताना या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. या चित्रपटामुळे अभिनेता अभय वर्मा (Abhay Verma) सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभय वर्माला या चित्रपटामुळे नव्याने ओळख मिळाली असून तो जणू तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला आहे. यापूर्वी अभय मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरीजमध्ये यशस्वी भूमिका साकारताना दिसला होता. आता मुंज्या चित्रपटामुळे अभय वर्माला स्टारडम मिळालं आहे. अभयने अलिकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याने सुहाना खानसोबत (Suhana Khan) काम करणं नाकारलं होतं

'द आर्चीज' ऐवजी हा चित्रपट निवडा

अभय वर्मा याने झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित 'द आर्चीज' (The Archies) चित्रपटात काम करणं नाकारलं होत. अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर यांनी 2023 साली प्रदर्शित झालेल्या आर्चीज चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात वेदांग रैना, अदिती सेहगल आणि युवराज मेंडा देखील झळकले होते. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीत मुंज्या फेम अभिनेता अभय वर्माने खुलासा केला आहे की, त्याने 'द आर्चीज' चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं पण त्याने नंतर तो चित्रपट सोडला. अभयने 'द आर्चीज' चित्रपटाऐवजी 'सफेद' या चित्रपटाची निवड केली.

'द आर्चिज' ऐवजी या चित्रपटाची निवड

'मुंज्या' फेम अभय वर्माने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे की, त्याला सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या 'द आर्चिज' चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण, 'द आर्चिज' चित्रपटातील भूमिकेऐवजी त्याने संदीप सिंग दिग्दर्शित 'सफेद' चित्रपट निवडला. सफेद चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला आहे. 'द आर्चीज' चित्रपटाऐवजी 'सफेद' चित्रपटात काम करण्याची इच्छा होती, असं अभयनं सांगितलं. दोन्ही चित्रपट एकाच वेळी बनत असल्याचं त्याने सांगितलं. अभय म्हणाला, 'मी 'द आर्चिज'साठी ऑडिशन दिलं होतं आणि प्रक्रियेत होतो, पण मला 'सफेद' चित्रपट करायचा होता म्हणूनच मी त्या चित्रपटाची निवड केली.'

चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये झळकलाय अभय वर्मा

अभय वर्माने 2023 साली 'सफेद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मीरा चोप्रा आणि बरखा बिश्त देखील होत्या. यानंतर अभय 'ए वतन मेरे वतन'मध्ये दिसला. त्याशिवाय ओटीटीवर सुपर हिट ठरलेल्या द फॅमिल मॅन या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही अभय वर्मा झळकला होता. या सीरीजमध्ये तो काही काळचं स्क्रिनवर दिसला, मात्र त्याने उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटही सोडला

संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातही तो दिसणार असल्याचे अभयने सांगितले. पण काही खास कारणामुळे त्याने हा चित्रपट सोडला. अभय म्हणाला की, आता मी तो चित्रपट केला असता. त्यावेळी माझ्याकडे इतर प्रोजेक्ट्स आले होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Munjya : वडिलांचा मृत्यू, घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिला; 100 कोटींचा चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याची संघर्षगाथा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget