एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांची मदत
साई दर्शन इमारतीतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली आहे.
मुंबई : मुंबईतल्या घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक आणि जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटरद्वारे मदतीची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय राजस्थान आणि आसाममधील पूरग्रस्तांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर झाली आहे. पुरातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली आहे.
https://twitter.com/PMOIndia/status/891908212613562372
https://twitter.com/PMOIndia/status/891908335846383616
आरोपी सुनिल शितपनं इमारतीचे पिलर हटवल्यामुळे 17 जणांचे जीव गेले होते. सुनील शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा), 336,338,283/17 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सुनिल शितपनं नर्सिंग होमच्या नूतनीकरणावेळी चक्क इमारतीचे पिलर बाजूला काढून त्याठिकाणी लोखंडी रॉड लावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमारतीचे पिलर काढून त्या जागी लोखंडी रॉड लावण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
रुग्णालयाचं नूतीनकरण करताना इमारतीच्या मूळ रचनेलाच धक्का लावण्यात आला होता. यावेळी पिलर तोडून लोखंडी रॉडनं आधार देण्यात आला होता. तसेच इमारतीच्या कॉलमलाही धक्का लावण्यात आल्यानं इमारत कोसळली असा दावा रहिवाशांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
घाटकोपरमध्येच सुनिल शितपची आणखी 4 अनधिकृत बांधकामं
पेपरवाला ते कोट्यधीश, सुनिल शितपचा 'सिनेमॅटिक' प्रवास
घाटकोपर इमारत दुर्घटना: शितपनं पिलरच हटवले, रहिवाशांचा आरोप
मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली
इमारत दुर्घटना : पत्नी आयसीयूत, चिमुरडी गमावली, आईचा पत्ता नाही
घाटकोपर इमारत दुर्घटना : शिवसेनेच्या सुनील शितपला अटक
ढिगाऱ्याखाली 15 तास मृत्यूशी झुंज, राजेश दोशी सुखरुप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement