PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण
कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची स्थापना केल्याचं जाहीर केलं. परंतु या फंडच्या स्थापनेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनीही पीएम केअर्स फंडवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पीएम केअर्सवर प्रश्न परंतु या फंडच्या स्थापनेनंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. देशात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असताना नव्या पीएम केअर्स फंडची स्थापना करण्याची गरज काय असा सवाल विचारला जात आहे. काहींनी तर पीएम केअर्स फंड हा घोटाळा असल्याचंही म्हटलं आहे. हा फंड कॅगच्या कक्षेबाहेर असू शकतो, जेणेकरुन या फंडमधून केलेल्या खर्चावर तसंच वापरावर कोणाची नजर नसेल, म्हणूनच त्याची स्थापना झाल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे. मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण हाच धागा पकडत पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदींवर टीका केली आहे. "जवाहरलाल नेहरु यांनी जानेवारी 1948 मध्ये राष्ट्रीय सहाय्यता निधी PM National Relief Fund स्थापन केला. आतापर्यंत एकाही पंतप्रधानांना नवीन राष्ट्रीय निधी सुरु करण्याची गरज वाटली नाही. पण पीएम केअर्स फंड सुरु करुन नरेंद्र मोदी यांनी सेल्फ प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही," असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.देशभर से लोगों ने COVID-19 के खिलाफ लड़ाई में सहयोग करने की इच्छा जाहिर की है।
इस भावना का सम्मान करते हुए Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund का गठन किया गया है। स्वस्थ भारत के निर्माण में यह बेहद कारगर साबित होगा। — Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
जवाहरलाल नेहरू यांनी जानेवारी १९४८ मध्ये राष्ट्रीय सहाय्यता निधी PM National Relief Fund स्थापन केला. आतापर्यंत एकाही प्रधानमंत्र्यांना नवीन राष्टीय निधी सुरू करण्याची गरज वाटली नाही. पण #PMCaresFund सुरू करून @narendramodi यांनी मात्र self-promotion करण्याची संधी सोडली नाही.
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 1, 2020
आणखी एका ट्वीटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत नुकतंच जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजच्या नवावरही आक्षेप घेतला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करताना ते राष्ट्रपतींचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे पॅकेज किंवा ट्रंप पॅकेज असल्याचे म्हटलं नाही. पण आपल्या भारतात मात्र आर्थिक पॅकेज हे #PMGaribKalyan पॅकेज आहे."PM National Relief Fund #PMRNF was started by Jawaharlal Nehru in January 1948 to help refugees from Pakistan. No other PM felt it necessary to start another national relief fund, except @narendramodi now. #PMCARES fund is a blatant attempt at self-promotion.
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 1, 2020
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचं नाव बदलून पीएम केअर्स का केलं नाही? : शशी थरुर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीही या फंडवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "पंतप्रधानांचं शब्दावरील प्रेम पाहता त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचं नाव बदलून पीएम केअर्स करता आलं असतं. पण नव्या ट्रस्टची स्थापना करण्याच्या आली आहे, ज्याच्या नियम आणि खर्चांबाबत कोणतीली स्पष्टता नाही. या असमान्य निर्णयासाठी तुम्हाला जनतेला उत्तर द्यावं लागेल. "जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात प्रोत्साहन पॅकेज ची घोषणा करताना ते राष्ट्रपतींचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे पॅकेज किंवा ट्रंप पॅकेज असल्याचे म्हणले नाही. पण आपल्या भारतात मात्र आर्थिक पॅकेज हे #PMGaribKalyan पॅकेज आहे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 1, 2020
आधीचा फंड असताना पीएम केअर्स फंड कशाला? : रामचंद्र गुहा तर प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही पीएम केअर्स फंडवर सवाल उपस्थित करत टीका केली आहे. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनीही पीएम केअर्स फंडवर सवाल उपस्थित करत टीका केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असतानाही नवा फंड कशाला? वैयक्तिक प्रतिमा सुधारण्यासाठी देखील या राष्ट्रीय संकटाचा वापर करण्याची गरज आहे का?This is important. Why not simply rename PMNRF as PM-CARES, given the PM's penchant for catchy acronyms, instead of creating a separate Public Charitable Trust whose rules & expenditure are totally opaque? @PMOIndia you owe the country an explanation for this highly unusual step. https://t.co/qRhX0T1PmB
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 30, 2020
This is a very important thread. Why a new fund when a Prime Minister’s National Relief Fund already exists? And why the self-aggrandizing name, PM-CARES? Must a colossal national tragedy also be (mis)used to enhance the cult of personality? https://t.co/97NspbaVwh
— Ramachandra Guha (@Ram_Guha) March 29, 2020