(Source: Poll of Polls)
चेंबूरमध्ये माजी मंत्र्यांच्या स्वागत कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
चेंबूर मधील काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नवी मुंबई येथील रुगणलायत गेले 20 दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
मुंबई : एकीकडे मुंबईमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना फिजिकल डिस्टन्सिंगची प्रचंड आवश्यकता आहे. मात्र कोरोनावर मात करून घरी परतलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागत कार्यक्रमात मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा कार्यकर्त्यांनी फज्जा उडवला.
चेंबूर मधील काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नवी मुंबई येथील रुगणलायत गेले 20 दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तीन चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर काल चौथी चाचणी निगेटिव्ह आली त्यानंतर त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली.चेंबूरच्या पी एल लोखंडे मार्गवर असलेल्या त्यांच्या घरी परतल्यावर रात्री हंडोरे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ,स्पीकर लावून जंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यानी केलेल्या गर्दीने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला गेला. तर अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते.
माजी मंत्र्यांनी ज्या कोरोनावर मात केली त्याच कोरोनाला पुन्हा निमंत्रण तर दिले. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून चेंबुरच्या जनतेला मदत करण्यासाठी चंद्रकांत हंडोरे विभागात फिरत होते आणि त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. परंतु काल रात्री साजरा झालेला हा जल्लोष मात्र त्यांचाच विभागाला कोरोनाच्या संकटात ढकलणार ठरू शकतो, मग अशा जल्लोष कार्यक्रमाची खरच गरज होती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत.
संबंधित बातम्या :
- केरळच्या 'छत्री पॅटर्न'चं पुण्याच्या मंचरमध्ये अनुकरण ठरलं फायदेशीर!
- मुंबई मेट्रोमध्ये सोशल डिस्टन्सिंगची तयारी सुरु; अधिकृत ट्विटवर फोटो शेअर