एक्स्प्लोर

केरळच्या 'छत्री पॅटर्न'चं पुण्याच्या मंचरमध्ये अनुकरण ठरलं फायदेशीर!

नथीचा नखरा, नऊवारी साडी, ब्लॅक गॉगल हे सुरु असलेले ट्रेंड आणि त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत मंचरकरांना 'सेल्फी विथ अम्ब्रेला' ची हाक देण्यात आली. बघता-बघता अबाल-वृद्धांपासून सर्वांच्याच स्टेटसवर छत्रीसोबतचे फोटो झळकू लागले.

पिंपरी चिंचवड : लॉकडाऊन चारमध्ये सरकारने शिथिलता आणली. त्यामुळेच नॉन रेड झोनमधील गावांप्रमाणेच पुण्यातील मंचरची बाजारपेठ सुरु झाली. साहजिकच नागरिकांची मोठी गर्दी झाली अन् सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. जनजागृती करूनही नागरिक निष्काळजीपणे वावरत होते. मग यावर मंचरचे सरपंच दत्ता गांजाळेंनी एक शक्कल लढवली. केरळच्या धर्तीवर गांजळेंनी गावात 'छत्री पॅटर्न' राबवायचं ठरवलं. महिलांनी ही कल्पना डोक्यावर घेतली. महिलांनी घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन केलं, यातूनच 'सेल्फी विथ अम्ब्रेला'चे स्टेटसही झळकू लागलेत.

भारत लॉकडाऊन झाल्याने गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बाजारपेठा ठप्प झाल्या. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकानांचे शटर्स बंद राहिले. पण 17 मे नंतर लागू झालेल्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शिथिलता आणली. पुण्याचं मंचर हे नॉन रेड झोनमध्ये येत असल्याने येथील बहुतांश दुकानांनी कामाचा श्रीगणेशा केला. नागरिकांनी ही दुकानाबाहेर खरेदीसाठी गर्दी केली. पण गेली दोन महिने ज्या कोरोनाची घराघरात चर्चा रंगली, त्यापासून बचावासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत जनजागृती झाली. त्याचा मंचरकरांवर अपेक्षित परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. मग यावर कसा तोडगा काढायचा असा प्रश्न मंचर ग्रामपंचायतीसमोर उभा ठाकला. त्यावर वेगवेगळे पर्याय सुचवण्यात आले.

केरळच्या 'छत्री पॅटर्न'चं पुण्याच्या मंचरमध्ये अनुकरण ठरलं फायदेशीर!

तितक्यात सरपंच दत्ता गंजाळेंच्या नजरेसमोर केरळचा 'छत्री पॅटर्न' आला. प्रत्येकाच्या हातात छत्री आली तर आपोआप सोशल डिस्टंसिंग राखलं जाईल. त्यामुळेच केरळच्या धर्तीवर मंचरमध्ये 'छत्री पॅटर्न' राबवण्याचा एकमताने निर्णय झाला. पण पाऊस नसताना छत्री वापरायची म्हणजे चेष्टा होणार. त्यामुळे या संकल्पनेला घेऊन अनेकांनी नाकं मुरडली. मग सरपंच दत्ता गांजाळेंनी स्वतःपासून याची सुरुवात केली. गांजाळे छत्री घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करायला रस्त्यावर उतरले.

दुसरीकडे महिला वर्गाने मात्र या भन्नाट कल्पनेला डोक्यावर घेतलं. ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन केलं. नथीचा नखरा, नऊवारी साडी, ब्लॅक गॉगल हे सुरु असलेले ट्रेंड आणि त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेत 'सेल्फी विथ अम्ब्रेला' ची हाक देण्यात आली. बघता-बघता अबाल-वृद्धांपासून सर्वांच्याच स्टेटसवर छत्रीसोबतचे फोटो झळकू लागले. हळूहळू महिला छत्री घेऊनच घराबाहेर पडू लागल्या. यामुळे सोशल डिस्टंसिंग राखला जाऊ लागला आणि उन्हापासूनही बचाव होऊ लागला. हा दुहेरी फायदा ओळखून महिलांनी 'छत्री पॅटर्न' स्वीकारला आणि हा उपक्रम शंभर टक्के राबवण्यासाठी स्वतःच्या हाती घेतला. आता घरातील महिलाच पुढे आहे म्हटल्यावर पुरुषांनी देखील यात सहभाग घेण्याशिवाय पर्याय उरलाच नाही.

लॉकडाऊन चारमध्ये मंचरमधील बाजारपेठेत सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. यावर तोडगा म्हणून सरपंच दत्ता गांजाळेंनी केरळच्या धर्तीवर छत्री पॅटर्न राबवला. पुढे लॉकडाऊनमध्ये सरकारकडून हळूहळू शिथिलता आणली जाणारेय. तेव्हा तुमच्या गावात ही सोशल डिस्टंसिंग राखणं कठीण होईल. त्यावेळी तुम्हाला कोरोनापासून चार हात लांब राहायचं असेल, तर या छत्री पॅटर्नचं अनुकरण तुम्ही नक्की करा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Municipal Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
BMC Election 2026 Dubar Voter In Mumbai: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
BMC Election 2026: मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
BMC Election 2026 Election Commission: आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Municipal Election 2026: मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
मतदानाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये EVM मध्ये बिघाड; प्रशासनाची धावपळ, नागरिकांचा संताप
BMC Election 2026 Dubar Voter In Mumbai: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांसमोर काय घडलं?
BMC Election 2026: मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईतील रात्री 12.30 वाजता शिंदे गटाच्या आमदाराचा मुलगा मतदान केंद्रात शिरला, ठाकरे गट आक्रमक, वॉर्ड क्रमांक 153 मध्ये नेमकं काय घडलं?
BMC Election 2026 Election Commission: आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
Maharashtra Municipal Election 2026: राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान; फडणवीस, ठाकरे बंधूंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान; फडणवीस, ठाकरे बंधूंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या, मराठी अभिनेत्रीची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट चर्चेत,'मनसे 'सपोर्ट करत म्हणाली ..
मोठी लढाई लढू, मातीसाठी रं गड्या, मराठी अभिनेत्रीची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट चर्चेत,'मनसे 'सपोर्ट करत म्हणाली ..
Nagpur Election 2026 : निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच नागपुरात रक्तरंजित राडा; भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, काँग्रेसवर गंभीर आरोप
निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच नागपुरात रक्तरंजित राडा; भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, काँग्रेसवर गंभीर आरोप
Embed widget