एक्स्प्लोर
Advertisement
प्रत्येकाच्या भाषणाची शैली वेगळी, मात्र पातळी सोडू नये : पंकजा मुंडे
मुंबई : प्रत्येकाची भाषण शैली वेगळी असते, मात्र कुणीही पातळी सोडू नये, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर निशाणा साधला. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला.
सोलापुरातील भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नींसंदर्भात केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता, त्या म्हणला, प्रत्येकाच्या भाषणाची एक शैली असते, मात्र कुणीही पातळी सोडू नये.
“गोपीनाथ मुंडे असो किंवा विलासराव देशमुख यांचीही स्वत:ची भाषणशैली होती. शिवाय, बाळासाहेबांचीही एक विशिष्ट शैली होती. मात्र, ती त्यांनाच शोभून दिसायची.”, असेही पंकजा म्हणाल्या.
चिक्की घोटाळ्याच्या आरोपांमुळे वैयक्तिकरित्या प्रचंड दु:ख झालं, त्रास झाला. गोपीनाथ मुंडे यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत कधीही त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप झाले नाहीत. त्यामुळे माझ्यावरील आरोप म्हणजे त्यांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवल्यासारखं मला वाटलं, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. शिवाय, भ्रष्टाचार आणि माझा कधीही संबंध येईल असं मला वाटत नाही, असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
‘माझा कट्टा’वरील पंकजा मुंडे यांचे महत्त्वाचे मुद्दे :
- कालपर्यंत 120 सभा घेतल्या - पंकजा मुंडे
- राजकारण्यांच्या मुलांमध्ये पात्रता असेल, तरच यश मिळतं - पंकजा मुंडे
- भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंची घुसमट व्हावी, इतके ते छोटे नेते नव्हते - पंकजा मुंड
- निवडणुकीच्या इनकमिंग-आऊटगोईंग सुरुच असतं - पंकजा मुंडे
- नातं हा विषय मुळात संशोधनाचा आहे - पंकजा मुंडे
- धनंजय 20 वर्षांपासून राजकारणात, मग जन्मापासूनच राजकारण करत होते का? - पंकजा मुंडे
- मी भावनेचं राजकारण करत नाही, भावनेने राजकारण करते - पंकजा मुंडे
- विकासावर मतं मिळावी, असं मला वाटतं - पंकजा मुंडे
- मी वजाबाकीचं राजकारण करत नाही - पंकजा मुंडे
- पक्षा-पक्षांमधील भांडणं, हा निवडणुकीचा भाग - पंकजा मुंडे
- प्रत्येकाच्या भाषणाची एक शैली, मात्र पातळी सोडू नये - पंकजा मुंडे
- बहीण खूप स्ट्राँग असली की भाऊ दूर जातात - पंकजा मुंडे
- भाजप कधीही कुणाचं घर फोडण्याचं काम करत नाही - पंकजा मुंडे
- महादेव जानकर हे अत्यंत भोळ्या स्वभावाचे माणूस आहेत - पंकजा मुंडे
- चिक्की घोटाळ्याच्या आरोपामुळे वैयक्तिकरित्या प्रचंड दु:ख झालं - पंकजा मुंडे
- भ्रष्टाचार आणि माझा कधी संबंध येईल, असं मला वाटत नाही - पंकजा मुंडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement