एक्स्प्लोर

मालाड टोईंग प्रकरण : कोण खरं, कोण खोटं?

दबाव वाढल्यानंतर टो करण्याचा आदेश देणारे मुंबई वाहतूक पोलिस हवालदार शशांक राणे यांचं निलंबन करण्यात आलं आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. परंतु तपासादरम्यान आणखी काही एक व्हिडीओ समोर आला असून जो पोलिसांची बाजू स्पष्ट करतो.

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांच्या टोईंग प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. स्तनपान करणाऱ्या महिलेची गाडी टो करुन नेणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे पोलिसांची बाजू मजबूत झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे दोन व्हिडीओ मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. मालाडमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेची गाडी टो करुन नेणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. दबाव वाढल्यानंतर टो करण्याचा आदेश देणारे मुंबई वाहतूक पोलिस हवालदार शशांक राणे यांचं निलंबन करण्यात आलं आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. परंतु तपासादरम्यान आणखी काही एक व्हिडीओ समोर आला असून जो पोलिसांची बाजू स्पष्ट करतो. या नव्या व्हिडिओत टो करण्याआधी बाळ गाडीबाहेर होतं आणि संबंधित महिला गाडीतूनच पोलिसांशी वाद घालत आहे. म्हणजेच जेव्हा गाडी टो केली, तेव्हा महिलेच्या पतीने हे बाळ तिच्या हातात दिलं. पोलिस सर्व व्हिडीओंची तपासणी करत आहेत. Malad_Towing_Case_2 "जर महिला जबरदस्तीने बाळासह गाडीत बसली होती, तर पोलिसांनी तिचा आणि बाळाचा जीव धोक्यात घालायला नको होता. पोलिसांनी हे प्रकरण समजुतीने हाताळायला हवं होतं," असं पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात महिला आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पोलिसांची कारवाई चुकीची होती, असं तिचं म्हणणं आहे. परंतु तक्रारदार महिला पोलिसांवर कारवाई करण्याच्या बाजूने नाही. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. तपास अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? शनिवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओत मालाडमध्ये नो पार्किंग झोनमध्ये एक कार उभी करण्यात आली होती. कारमालक काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तर या कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे महिला (त्याची पत्नी) आपल्या सात महिन्याच्या लेकराला दूध पाजत बसली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी बळजबरीने ही कार टो करुन नेली. महिलेवर कारवाई व्हावी : महिला आयोग दरम्यान मुंबईच्या मालाडमधील टोईंगप्रकरणी आईवर कारवाई व्हावी, असं मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं. आईने सात महिन्याच्या बाळाचा जीव धोक्यात घातला असून तिच्या बेजबाबदारपणामुळे तिच्यावर कारवाई व्हावी असं महिला आयोगाने म्हटलं आहे. संबंधित बातम्या टोईंगवेळी कारमधील 'त्या' महिलेकडे बाळ नव्हतं?

कारमध्ये महिला लेकराला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग

आधीचा व्हिडीओ नंतरचा व्हिडीओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Embed widget