एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
व्यवहार मराठीत करा, अन्यथा आंदोलन; मनसेचं बँकांना पत्र
18 नोव्हेंबर रोजी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याला हात घातला होता.
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकांना आज मनसेकडून पत्र देण्यात आलं. लवकरात लवकर बँकांचे व्यवहार मराठी भाषेत सुरु करावेत, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, अशा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
18 नोव्हेंबर रोजी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याला हात घातला होता. बँकांचे व्यवहार मराठीत करा, नाहीतर आंदोल करु, असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यानुसार, आज मनसेकडून बीकेसीमधील बँकांना पत्र देऊन व्यवहार मराठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेचा प्रचार ब्ल्यू प्रिंटने, तर भाजपचा ब्ल्यू फिल्म दाखवून : राज ठाकरे
ठाण्याच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे की, बँकेचा व्यवहार हा संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेनुसारच असावा. मात्र महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही. प्रत्येक राज्यात बँकेचा व्यवहार हा त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये होते, असं राज ठाकरे म्हणाले होते.
मनसैनिक बँकेत जाऊन व्यवहार मराठीत सुरु आहे की नाही ते पाहतील. जर होत नसतील, तर ते करण्यास भाग पाडतील. आम्ही कोणताही कायदा मोडत नाही, फक्त आरबीआयचे नियम लागू करत आहोत, असं राज ठाकरे म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement