Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो उद्याच्या दिवसाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock: उद्या मध्य रेल्वेकडून मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. काही दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या लोकलच्या (Mumbai Local) मार्गांवर रविवारी (17 जून) रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावे असं आवाहन रेल्वेमार्फत करण्यात येत आहे. तसेच देखभालीच्या आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्ये रेल्वेच्या ठाणे - कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत डाउन जलद सेवा ही ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तसेच यादरम्यान या लोकल नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर देखील थांबतील. तर निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशिराने या लोकल धावतील. कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरुन सुटणाऱ्या लोकल या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर या लोकल थांबवण्यात येतील. त्यानंतर मुलुंड येथून ही वाहतूक अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर या मार्गावरही दहा मिनिटे उशीराने लोकल धावतील.
हार्बर मार्गावरही उद्या मेगाब्लॉक
पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 वाजेपर्यंत या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र नेरुळ ते खारकोपर सेवेवर मेगाब्लॉगचा कोणताही परिणाम होणार नाही. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 03.12 वाजेपर्यंत सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत.
पनवेल ते ठाणे या अप ट्रान्सहार्बर मार्गावर देखील सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर ठाणे ते पनवेल या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत ठाणे ते वाशीदरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान देखील विशेष गाड्या धावणार आहेत. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉग घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Costal Road: मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट मिळणार? नोव्हेंबरमध्ये कोस्टल रोड खुला होण्याची शक्यता