एक्स्प्लोर

Fake Hand Sanitizers:कोरोनाच्या महामारीत आरोग्याशी खेळ, Mumbai FDA ने जप्त केले बनावट हॅन्ड सॅनिटायझर्स

Fake Hand Sanitizers:मुंबई अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA)नोव्हेंबर 2021 ला मुंबईतील तळोजा परिसरात धाड टाकून जवळपास 19 लाख रूपयांचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर्स जप्त केले होते.

Coronavirus Covid-19 Omicron : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉनने कहर केला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्या पटीने वाढतेय. त्यामुळे भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशात  कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ज्या तीन गोष्टींचे पालन करावे लागते त्यातला मुख्य घटक म्हणजे हॅन्ड सॅनिटायझर. आता मुंबई अन्न आणि औषध प्रशासन विभागाची (FDA)नजर याच हॅन्ड सॅनिटायझर्सवर पडली आहे. 
मुंबई अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA)नोव्हेंबर 2021 ला मुंबईतील तळोजा परिसरात धाड टाकून जवळपास 19 लाख रूपयांचे हॅन्ड सॅनिटाईझर्स जप्त केले होते. ज्याचे 6 नमुने टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवले होते. याच संदर्भात जे रिपोर्ट्स समोर आलेले आहेत ते अक्षरश: थक्क करणारे आहेत. 

मुंबई अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (FDA)असिस्टंट कमिशनर गणेश रोकडे यांनी असे सांगितले की, हे सगळे सॅनिटाईझर्स बनावट आहेत. यांचा वापर करण्यात काही अर्थ नाही. त्याचबरोबर रोकडे यांनी असे सांगितले की, सामान्य व्यक्तीला हे हॅन्ड सॅनिटाईझर्स खरे आहेत की खोटे हे ओळखणंदेखील कठीण आहे. 
मुंबईत दिवसाला जवळपास 20,000 हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या समोर येतेय. देशाला ही चिंता तर आहेच पण यामागचं खरं कारण असंही आहे की जेव्हा कोरोनाबाधित रूग्णांच्या केसेस कमी झाल्या होत्या तेव्हा लोकांनी सॅनिटायझरचा वापर कमी केला होता. आता ज्या वेगाने रूग्णांची संख्या वाढतेय लोकांनी पुन्हा एकदा सॅनिटायझर वापरायला सुरुवात केली आहे. 

मुंबई अन्न आणि औषध प्रशासनाने 21 नोव्हेंबरला टाकलेल्या धाडीत जे सॅनिटायझर्स जप्त केले होते त्यांचा रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्ट्सनुसार हे सर्व सॅनिटायझर्स बनावट असल्याचं समजतं आहे. याचाच अर्थ कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्या जंतुविरहित एंटीबॅक्टीरियल सॅनिटायझरची गरज असते तो पदार्थ या सॅमप्ल्समध्ये आढळून आला नाही. 
गणेश रोकडे यांनी असे सांगितले की, सामान्यत: चांगल्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल, इथेनॉल आणि हायड्रोजन पॅरोक्साईडसारखे केमिकल काही प्रमाणात असावे लागतात. परंतु, हे केमिकल्स फार महाग असतात. त्यामुळे बनावटखोर यामध्ये इथेनॉलच्या जागी इंडस्ट्रियल वापरासाठी वापरण्यात येणारे मिथेनॉलचा वापर करतात.  जे इथेनॉलच्या तुलनेत फार स्वस्त असतात. 
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, मिथेनॉलमध्ये कोणत्याच प्रकारचे जंतुविरहित घटक नसतात. याउलट, यांच्या वापराने हातांना जळजळ आणि त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतो. रोकडे यांनी असेही सांगितले की कित्येक सॅम्पल्समध्ये मिथेनॉलचासुद्धा वापर केला गेला नव्हता. त्यामध्ये फक्त सुगंधित तेलाचा वापर करून ते विकले होते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही सॅनिटायझर घ्यायला मेडिकलमध्ये जाल तेव्हा त्यावर लिहिलेली माहिती, उत्पादनाची तारीख, निर्मात्याचे नाव आणि त्याचा लायसन्स नंबर नीट तपासून घेणे तसेच सॅनिटायझरचे बिलदेखील मागणे गरजेचे आहे असे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.