Omicron : लस न घेतलेल्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका! ऑक्सिजन बेडवरील 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण लस न घेतलेले
Omicron Variant : सध्या ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांचे लसीकरण झालेले नाही, अशी माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.
Covid19 Vaccination : सध्या ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांचे लसीकरण झालेले नाही, अशी माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. त्यामुळे लसीकरण न झालेल्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका जाणवण्याची शक्यता आहे. सध्या राज्यासह देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत आहे. अशातच राज्यातील रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक बाब आहे.
कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण हा उपाय आहे. मात्र अद्यापही काही नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालिका आयुक्त यांनी महत्त्वाची माहिती आणि इशारा दिला आहे. चहल यांनी म्हटले आहे की, ''सध्या असणाऱ्या ऑक्सिजनवर असणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 90 टक्के नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. त्यांना संसर्गाची भीती जास्त आहे.'' कोरोना लसीकरणाच्या साहाय्याने आपण तिसरी लाट थोपवू शकतो. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नसेल त्यांनी लसीकरण करा, असं आवाहनही आयुक्तांनी केलं आहे.
लॉकडाऊन लावायचा की नाही हे नागरिकांनी ठरवावे. कारण त्यांनी जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोना रुग्णांची संख्या वाढून निर्बंध आणखी कडक करावे लागतील असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले. लॉकडाऊनबाबत दोन महत्त्वाचे निकष, आहेत. हॉस्पीटलमध्ये किती बेड भरले आणि किती शिल्लक आहेत. दुसरा म्हणजे ऑक्सीजनचा वापर. कारण ऑक्सीजनचा वापर जर वाढला, हॉस्पीटलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले तर लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ शकतो असेही चहल म्हणाले. कोरोनाच्या आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही तर हॉस्पीटलच्या वापरावर निर्णय होणार असल्याचेही ते म्हणाले. ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका, तो एक विषाणू आहे असेही चहल यावेळी म्हणाले.
सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परत मुंबईत लॉकडाऊन होणार का? निर्बंध अधिक कठोर करणार का? याबाबत मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्याशी एबीपी माझाने संवाद सधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली. सध्या मुंबईत 10 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सीजनचा वापर होत आहे. ओमायक्रॉन झाला असला तरी हॉस्पीटलमध्ये जाण्याचे प्रमाण कमी आहे. ज्यांना लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत, त्यांना ओमायक्रॉनचा धोका कमी असल्याचे चहल यांनी सांगितले. लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांनी लस घेतली त्यांना ओमायक्रॉन झाला तरी घाबरण्याचे कारण नाही. त्यांना जास्त लक्षणे दिसूनही येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai Corona Update : मुंबईत लॉकडाऊनची भीती! परप्रांतीय मजूर धास्तावले? गावी जाण्यासाठी गर्दी, अफवांचेही पेव
- Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर 36 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, घरातून बाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक
- CES 22 Top Gadgets : रंग बदलण्याऱ्या कारने वेधलं लक्ष, टेक-गॅजेटच्या कुंभमेळ्यातील थक्क करणारे टॉप गॅजेट्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha