एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑफिसमध्ये जेवण पोहचवणाऱ्या मुंबईच्या डब्बेवाल्यांवर उपासमारीची वेळ; आर्थिक मदतीची मागणी
लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने मुंबईच्या डब्बेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे डब्बेवाल्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
मुंबई : चोवीस तास सुरू असणाऱ्या मुंबई या मायानगरीत बाराही महिने मुंबईचे डब्बेवाले आपली सेवा देत असतात. परंतु, लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे या डब्बेवाल्यांचे दैनंदिन काम बंद झालं आहे. त्यामुळे आता या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन जाहीर होऊन आता जवळपास महिना उलटला आहे. याचा परिणाम डबेवाल्यांचे पगार देखील बंद झाले आहेत. सध्या लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे काही प्रमाणात डब्बेवाले गावी गेले आहेत. परंतु, काही डब्बेवाले मात्र मुंबईत अडकून पडले आहेत. त्यामुळे आता अडकून पडलेल्या डबेवाल्यांची उपासमार होऊ नये यासाठी आम्हांला आर्थिक मदत करा अशी मागणी मुंबई डबेवाला संघटनेकडून करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना मुंबई डब्बेवाला संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळडोके म्हणाले की डबेवाल्यांचे काम बंद झाल्यामुळे त्यांना पूर्ण महिन्याचा पगार मिळालेला नाही. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला आता महिना उलटला आहे. आणखी तो किती दिवस राहिल याची काही माहिती नाही. त्यामुळे आता काम नसल्यामुळे आमच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नुकताच सरकारच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये इतकी आर्थिक मदत करण्यात आली आहे. याचं प्रमाणे राज्य शासनाने आमचा देखील विचार करून आम्हांला देखील 2 हजार रुपये इतकी मदत करावी. आमचे जवळपास 5 हजारांच्या आसपास सदस्य आहेत. यातील अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. सरकारच्या वतीने मदत झाल्यास त्यांना थोड्याफार प्रमाणात मदत होईल.
दिलासादायक! आज कोरोना बाधितांची वाढ निम्म्याने घटली; दिवसभरात 440 नवीन रुग्णांची नोंद
याबाबत बोलताना मुंबई जेवणं डबे वाहतूक मंडळाचे अध्यक्ष उल्हास मुके म्हणाले की, वर्षभर 2 लाखांहून अधिक जणांना मुंबईतील डबेवाला जेवणं पोहच़वत असतो. परंतु आता लॉकडाऊनमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आमच्या डबेवाल्यांचे खायचे वांदे झाले आहेत. आगामी काळातील परिस्थिती ओळखून यातील अनेकांनी गावाला जाण्यास पसंती दिली. परंतु, अजूनही अनेक डबेवाले सध्या मुंबईत अडकून पडले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांच्या घरात वैद्यकीय उपचाराला देखील आता पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे या बाबीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर आमच्या बांधवांना कमीत कमी 2 हजार रुपये इतकी आर्थिक मदत करावी. किमान या पैशातून त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तरी घेता येतील.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement