एक्स्प्लोर

दिलासादायक! आज कोरोना बाधितांची वाढ निम्म्याने घटली; दिवसभरात 440 नवीन रुग्णांची नोंद

राज्यात आज 440 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची 8068 झाली आहे. तर, दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांचा आकडा आजही चढताच आहे. दिलासादायक म्हणजे ही वाढ कालच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. आज राज्यात कोरोनाबाधीत 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8068 झाली आहे. आज 112 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1188 रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 19 लोकांचा कोरोनामुळे बळी गेलाय, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 16 हजार 345 नमुन्यांपैकी 1 लाख 7 हजार 519 णांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 8068 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 36 हजार 926 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 9116 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

..तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र

आज राज्यात 19 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 342 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 19 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 7 रुग्ण आहेत. तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर दोन रुग्ण 40 वर्षाखालील आहे. या 19 मृत्यूंपैकी 4 रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती मिळालेली नाही.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी) मुंबई महानगरपालिका: 5407 (204) ठाणे : 738 (14) पालघर : 141 (4) रायगड : 57 (1) नाशिक : 131 (12) अहमदनगर : 36 (2) धुळे : 25 (3) जळगाव : 19 (4) नंदूरबार : 11 (1) पुणे : 1052 (76) सोलापूर : 47 (5) सातारा : 29 (2) कोल्हापूर : 10 सांगली : 27 (1) सिंधुदुर्ग : 1 रत्नागिरी : 8 (1) औरंगाबाद : 50 (5) जालना : 2 हिंगोली : 8 परभणी : 1 लातूर : 9 (1) उस्मानाबाद : 3 बीड : 1 नांदेड : 1 अकोला : 29 (1) अमरावती : 20 (1) यवतमाळ : 48 बुलढाणा : 21 (1) वाशिम : 1 नागपूर : 107 (1) वर्धा : ० भंडारा : ० गोंदिया : 1 चंद्रपूर : 2 गडचिरोली : ० एकूण : 8068 (342 )

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा/मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 604 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 8603 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 33.72 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Uddhav Thackeray | मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget