एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली, 5 जणांचा मृत्यू
मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली.
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.
घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ साईदर्शन नावाची इमारत होती. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही इमारत जमीनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून नऊ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावर एक नर्सिंग होम कार्यरत होतं. इथे गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचं काम सुरु होतं. मात्र ते काम करताना इमारतीच्या मुख्य गाभ्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्याने इमारत कोसळल्याचं सांगण्यात येतंय. मात्र त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
ही इमारत 30 वर्षे जुनी होती. जीर्ण झालेली साईदर्शन इमारत आज कोसळली आणि इथे राहणाऱ्या 12 कुटुंबावर काळाने घाला घातला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दल, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर आहे. याशिवाय 8 अॅम्ब्युलन्स घटनस्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.
इमारत अनधिकृत नव्हती : प्रकाश मेहता
साईदर्शन इमारत अनधिकृत नव्हती. चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं आहे. तसंच या विभागात अनेक इमारतींना ओसी नाही. महापालिकेने त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करावं, अशी सूचनाही त्यांनी केली.
इमारतीला नोटीस नाही : महापौर
दरम्यान मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घाटकोपरमधील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी धोकादायक इमारतीला कुठलीही नोटीस दिली नसल्याचं महापौर महाडेश्वर म्हणाले. शिवाय दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
शिवसेनेच्या विभागप्रमुखांची माहिती
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकले आहेत. ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलेल्या नागरिकांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इमारतीला तडे गेले होते. इमारतीखाली असलेल्या नर्सिंग होमचं रिनोव्हेशन सुरु होतं. त्यामुळे हॉस्पिटल रिकामं होतं. परंतु वरच्य मजल्यांवर लोक राहत होते. ही इमारत जुनी होती, मात्र महापालिकेच्या नोटीसविषयी अद्याप माहिती नाही, असं शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितलं.
इमारत दुर्घटनेचे नाहक बळी
जुलै 2007, बोरीवली, मुंबई
लक्ष्मी छाया इमारत कोसळली, 29 रहिवाशांचा मृत्यू
जून 2008, मुंबई
कुंभारवाडा परिसरातील दत्त निवास इमारत कोसळली, 29 जणांचा मृत्यू
जून 2013, माहीम, मुंबई
माहीम दर्ग्याजवळ अल्ताफ इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू, 6 जखमी
एप्रिल 2013, मुंब्रा, ठाणे
शीळ डायघरमधील अनधिकृत इमारत कोसळली
74 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
सप्टेंबर 2013, माझगाग डॉकयार्ड, मुंबई
बाबू गेनू मंडईजवळ कामगार वसाहत इमारत कोसळली
61 जणांचा मृत्यू
घाटकोपरमधील दुर्घटनेचं ठिकाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement