एक्स्प्लोर
'Nikita Kite'चं मराठीत 'निकिता पतंग', मुंबई विद्यापीठाची बौद्धिक दिवाळखोरी
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रांमधून आपली बौद्धिक दिवळखोरी दाखवून दिली आहे. मुंबई विद्यापीठाकडून पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या पदवी प्रमाणपत्रांमध्ये शुद्धलेखनाच्या अत्यंत क्षुल्लक चुका समोर आल्या आहेत. 'KITE NIKITA BABURAO SUREKHA' हे नावाचं मराठीत भाषांतर करुन 'पतंग निकिता बाबुराव सुरेखा' असं छापण्यात आले आहे.
निकिता किटे या विद्यार्थिनीने बॅचलर ऑफ मास मीडियाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचं पदवी प्रमाणपत्र तिला प्रदान करण्यात आले. त्यावर शुद्धलेखनाच्या क्षुल्लक चुका आढळून आल्या आहेत.
https://twitter.com/kite_nik/status/835721338383974402
'KITE' अशी इंग्रजीत स्पेलिंग असलेल्या निकिताच्या आडनावाचं मराठीत भाषांतर करुन विद्यापीठाने 'पतंग' असं छापलं आहे.
विशेष म्हणजे निकिताचीच मैत्रीण असलेल्या दिपालीच्या आडनाबाबतही अशीच चूक करण्यात आली आहे. 'THAKURDESAI DEEPALI VASUDEV SWATI' या नावाचं मराठीत भाषांतर करुन 'ठाकुरभाई दिपाली वासुदेव स्वाती' असं केलं आहे. 'THAKURDESAI' चं 'ठाकुरभाई' कसं होऊ शकतं, असा प्रश्न दिपालीला पडला आहे.
https://twitter.com/kite_nik/status/835836263735443456
निकिता किटेने ट्विटरवरुन पदवी प्रमाणपत्राचे फोटो शेअर करत मुंबई विद्यापीठ आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना या प्रकरणात लक्ष देण्याचं आवाहनही केलं आहे.
मुंबई विद्यापीठ शुद्धलेखनातील या चुकांकडे गांभिर्याने पाहत काही कारवाई करणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement