एक्स्प्लोर

MHADA Lottery 2024: म्हाडा लॉटरीत मुंबईतील कोणत्या एरियात घरं, मिडलक्लास आणि हायक्लाससाठी कोणत्या एरियात घरं, उत्पन्नाची मर्यादा किती?

Mumbai news: अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक (MHADA) असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत (Mhada Lottery) जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 9 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून प्रारंभ होणार आहे. https://housing.mhada.gov.in , https://mhada.gov.in , Mobile App- MHADA Housing Lottery System याठिकाणी म्हाडा लॉटरीबाबत सविस्तर माहिती पाहता येईल.

मुंबईतील कोणत्या भागात म्हाडाची घरं?

म्हाडाने बांधलेल्या 1327 घरांसोबत कास नियंत्रण नियमावाली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून बिल्डर्सकडून मिळालेली 370 घरं आणि पूर्वीच्या लॉटरीत विविध ठिकाणी  उरलेल्या 333 घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हाडाच्या लॉटरीसाठी नेहमीप्रमाणे अत्यल्प (6 लाख), अल्प (9 लाख), मध्यम (12 लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे 12 लाखांपेक्षा अधिक  असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आले आहेत. मुंबई उपनगरातील  पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड याठिकाणी म्हाडाची घरे आहेत. या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. 

कोणत्या गटासाठी किती घरं?

म्हाडाकडून ज्या 2030 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरं उपलब्ध आहेत.

म्हाडाच्या अर्जाची किंमत किती?

अर्ज शुल्क ₹ ५००/- + जीएसटी @ १८% ₹९०/- एकूण ₹ ५९०/- अर्ज शुल्क विना परतावा

म्हाडा लॉटरीचे सविस्तर वेळापत्रक

* सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरूवात दिनांक व वेळ- दि. ०९/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. पासून

* अनामत रक्कम भरण्याचा दिनांक व वेळ- दि. ०९/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. पासून

* ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक व वेळ- दि. ०४/०९/२०२४ दुपारी ३.०० वा. पर्यंत

* अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटचा दिनांक व वेळ- दि. ०४/०९/२०२४ रात्री ११.५९ वा. पर्यंत

*  सोडतीसाठी प्राप्त अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ- दि. ०९/०९/२०२४ सायंकाळी ६.०० वा.

* प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे/हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ- दि. १०/०९/२०२४ दुपारी १२.०० वा. पर्यंत

* सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी प्रसिद्धी दिनांक व वेळ- दि. ११/०९/२०२४ सायंकाळी ६.०० वा

* सोडतीचा दिनांक व वेळ-  दि. १३/०९/२०२४ सकाळी ११.०० वा.

* सोडतीचे ठिकाण- नंतर जाहीर करण्यात येईल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर | ABP Majha | 06 NOV 2024Muddyache Bola Tuljapur : तुळजापुरात 'जरांगे फॅक्टर' महत्त्वाचा ठरेल ? : मुद्द्याचं बोलाYogi Adityanath Amravati : एकत्र राहिलात तर कुणाची हिम्मत होणार नाही दगडफेक करायची :योगी आदित्यनाथABP Majha Headlines | 6 PM TOP Headlines | 6 PM 06 November 2024 | Headlines Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Embed widget