Railway Megablock | रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर, हार्बरवर वाशी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर माहिम ते गोरेगावदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे.
मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर, हार्बरवर वाशी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर माहिम ते गोरेगावदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजता ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकदरम्यान धीम्या गाड्या कल्याण ते मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांत गाड्या थांबणार नाहीत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेवर वाशी ते पनवेलदरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते बेलापूर, पनवेल दोन्ही मार्गावर आणि पनवेल, बेलापूर ते ठाणे अप मार्ग तसेच पनवेल ते अंधेरीदरम्यानच्या उपनगरी रेल्वे सेवा बंद असणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर माहिम ते गोरेगाव दरम्यान सकाळी 11 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान हार्बरवरील सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगावदरम्यान आणि चर्चगेट ते गोरेगाव धीम्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.