एक्स्प्लोर
पवईत कंपनीच्या बेसमेंटला भीषण आग, 70-80 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका
बेसमेंटमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या वायर आणि इतर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली.
मुंबई : आगीच्या घटना मुंबईत सुरुच आहेत. पवईच्या चांदिवली विभागात असलेल्या नेट मॅजिक कंपनीच्या तळमजल्याला भाषण आग लागली. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या वायर आणि इतर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली.
इमारतीमधून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.
इमारतीमधील 70 ते 80 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. मात्र ही आग नेमकी कशामुळे धुमसली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती नेट मॅजिककडून देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement