एक्स्प्लोर

पाईपवर चढून दरवाजा तोडला, कमला मिल अग्नितांडवातील देवदूत

अनेकांसाठी देवदूत बनून आलेल्या महेश साबळे या तरुणाने त्या दिवशी एक्झिटचा दरवाजा तोडून अनेकांचा जीव वाचवला.

मुंबई : कमला मिलमध्ये आग लागली त्यादिवशी एक्झिट दरवाजा बंद होता. अंधारामुळे अनेक लोकांना काहीच दिसत नव्हतं. मात्र अनेकांसाठी देवदूत बनून आलेल्या महेश साबळे या तरुणाने त्या दिवशी एक्झिटचा दरवाजा तोडून अनेकांचा जीव वाचवला. प्रभादेवीला छोट्याशा चाळीत राहणारा 25 वर्षीय महेश साबळे हा तरुण साताऱ्याहून मुंबईला पोलीस भरतीसाठी आला होता. आग लागली त्या दिवशी कमला मिल इथेच एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून तो कामावर होता. आग लागल्यामुळे अनेकजण या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात आले. तिथून खाली जाण्यासाठी मार्ग लोकांना सापडत नव्हता. तिथला एक्झिटचा दरवाजाही बंद होत. महेशने पाईपवर चढून जाऊन तो दरवाजा तोडला आणि अनेकांना खाली उतरण्यासाठी मदत केली. अनेक जखमींनाही त्याने वाचवलं. महेशने आजपर्यंत चार वेळा पोलीस भरती केली, पण यश आलं नाही. म्हणून सक्षम या सुरक्षा एजंन्सीमध्ये तो सुरक्षा रक्षकांचं काम करतो. यानंतर या एजन्सीने त्याला 20 हजार रुपयांचं बक्षीस दिलं. महेश भाजप कार्यकर्त्याचा भाऊ असल्यामुळे मुंबईचे भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनीही 25 हजार रुपये बक्षीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवण्याचं आश्वासन दिलं. साताऱ्याच्या छोट्याश्या गावातून येऊन मुंबईत पोलीस बनण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या महेशने सुरक्षा रक्षक म्हणून तरी कामगिरी चोख बजावली. पोलीसमध्ये भरती व्हायचं त्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू कमला मिलमधील 'मोजोस् बिस्रो' आणि '1 अबव्ह' या हॉटेलांना गुरुवारी रात्री आग लागली होती. यामध्ये 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईसाठी तातडीने हालचाली केल्या आहेत. मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई देखील सुरु करण्यात आली आहे. 1 अबव्ह पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं. ‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’ आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget