एक्स्प्लोर

महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करू देण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी

राज्यपालांनी घेतली विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक. महाविद्यालयीन वर्ग त्वरित सुरु करू देण्याची कुलगुरूंची राज्यपालांकडे मागणी.विद्यापीठातील संविधानिक पदे त्वरित भरण्याबाबत राज्यपालांच्या सूचना.

मुंबई : राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. मात्र, शासनाच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरु करता येत नाही. महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी देखील करीत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरु करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी एकमुखी मागणी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे केली.

राज्यातील विद्यापीठांमधील अनेक संविधानिक पदे रिक्त असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही पदे भरण्याची अनुमती द्यावी अशीही मागणी यावेळी कुलगुरूंनी केली. या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यापीठांना संविधानिक पदे यथाशीघ्र भरण्याची अनुमती द्यावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाला केली. विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरु करण्याबाबत देखील लवकर निर्णय घ्यावा असेही राज्यपालांनी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ते बोलत होते. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील सर्व 20 विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. विद्यापीठांचे 2020-21 या शैक्षणिक सत्रातील प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे, विद्यापीठांमधील रिक्त संविधानिक पदांचा आढावा घेणे तसेच विद्यापीठांच्या वार्षिक लेखा परीक्षणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याकरिता राज्यपालांनी बैठकीचे आयोजन केले होते.

Maharashtra College Update: 'या' तारखेपर्यंत राज्यात महाविद्यालयं सुरू? उदय सामंतांची मोठी घोषणा

बैठकीला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, आज इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले असल्याचे वर्तमानपत्रातून कळते. अश्यावेळी महाविद्यालये व विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग सुरु न होणे विसंगत व विपरीत वाटते. विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरु केली आहेत व ऑनलाईन पद्धतीने वर्ग देखील होत आहेत. आता करोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अश्यावेळी महाविद्यालयीन वर्ग सुरु करता येईल का किंवा पाळीमध्ये चालवता येईल का याचा विद्यापीठांनी विचार करावा असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील महाविद्यालये कसे सुरु करावे याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी वर्ग सुरु करण्याबद्दल आपण होऊन पुढाकार घेतला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपापले लेखापरीक्षण नियमितपणे करून घ्यावे अशीही सूचना राज्यपालांनी विद्यापीठांना केली.

विद्यापीठांमध्ये संविधानिक पदांशिवाय शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जवळ जवळ 50 टक्के पदे रिक्त असल्याचे काही कुलगुरूंनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. बैठकीमध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विषय पत्रिकेशी निगडीत आपापल्या विद्यापीठांसंबंधी माहिती राज्यपालांना सादर केली.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget