Aslam Shaikh Threatening Call : अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी, गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने धमकी आल्याची माहिती
Aslam Shaikh Threatening Call : माजी मंत्री आणि काँग्रेसेचे आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेसचे मालाड मालवणी मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती देण्यात आलीये. ही धमकी गँगस्टार गोल्डी ब्रार (Goldi Brar) याच्या नावाने ही धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी बांगुर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर पोलीस देखील या प्रकरणी अधिक तपास करतायत. तर या फोन कॅनडामधून आला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं ?
मुंबईतील मालाड मालवणी मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अस्लम शेख यांना 5 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मोबाईलवर एका अज्ञान नंबरवरुन कॉल आला. तो फोन अस्लम शेख यांचे पीए विक्रम कपूर यांनी उचलला. त्यावेळी पुढील दोन दिवसांत आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. तो फोन झाल्यानंतर विक्रम कपूर यांनी तात्काळ बांगूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन कॅनडामधून आला असल्याची माहिती देण्यात आलीये. तर पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांना आला होता धमकीचा फोन
शुक्रवारी रात्री उशीरा मुंबई नियंत्रण कक्षाला कॉल केला होता. या व्यक्तीने पोलिसांना कॉल करत बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली होती. त्याने फोनवर सांगितलं होतं की, पाकिस्तानमधून आलो आहोत सांभाळून रहा. तुमच्या बाजूला दोन-तीन तासात बॉम्ब फुटेल, अशी धमकी कॉलरने दिली होती. त्याने कॉल दरम्यान सीमा हैदरचा देखील उल्लेख केला होता. आरोपीने दारूच्या नशेत धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या धमकीच्या कॉल प्रकरणी नागेंद्र ज्ञानेंद्र शुक्ला या 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.
मुंबई पोलिसांना अनेक वेळा आलेत धमकीचे फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला याआधीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा पोलिसांना असे फेक कॉल येतात. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं.
हेही वाचा :
Mumbai News : मुंबईतील आर्थर रोड कारागृहातही अंमली पदार्थांची तस्करी, पोलीस हवालदारालाच केली अटक