Mumbai News : मुंबईतील आर्थर रोड कारागृहातही अंमली पदार्थांची तस्करी, पोलीस हवालदारालाच केली अटक
Mumbai News : मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये पोलीस हवलदाराने अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकणी त्याला अटक करण्यात आलीये.
मुंबई : पुण्याच्या (Pune) येरवडा मध्यवर्ती कारागृहानंतर आता मुंबईतील (Mumbai) आर्थर रोड (Arthur Road Jail) कारागृह चर्चेत आले आहे. आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातील एका पोलीस हवालदाराला कारागृहात कैद्यांना ड्रग्ज (Drugs) तस्करी केल्या प्रकरणी अटक करण्यात आलीये. विवेक नाईक असं या पोलीस हवालदाराच नाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक नाईक याला कारागृहात 71 ग्रॅम चरसची तस्करी करताना पकडण्यात आले.
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहात देखील अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं समोर आलंय. पण यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा धक्कादायक बाब देखील उघडकीस आलीये. या पोलीस हवालदाराविरोधात एन.एम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये या हवलदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं प्रकरण काय ?
पोलीस हवालदार नाईक याला आर्थर रोड कारागृहाच्या चकिंग गेटवर पकडण्यात आले. त्यावेळी त्याने चरसच्या कॅप्सूल पॅक करुन त्याच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवल्या होत्या. त्याच्याकडून सुमारे आठ कॅप्सूल सापडले. या कॅप्सूल आरोपी नाईकला हे ड्रग्ज राहुल नावाच्या कैद्याने होते. तर हे कॅप्सून त्याने नाईक याला अतिसुरक्षा सर्कल 02 मधील आरोपी राशीद याला देण्यासाठी सांंगितले होते. पण त्याचवेळी त्याला कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांनी पकडले आणि त्याला अटक केली. त्यावेळी हवालदार नाईक याने त्याला तपासणाऱ्या पोलीस हवालदाराच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य गेटवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडले.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान पोलीस हवालदार नाईकला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान आरोपी आरोपी नाईक हा आर्थर रोड कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याला ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांकडूनच कारागृहात ड्रग्जची तस्करी केली जात असल्याचा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान यावर आता कोणती कठोर कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या राज्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक, पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केलीये. तर आता मुंबईतही पोलिसांची कारवाई सुरु असल्याचं पाहायला मिळतय. दरम्यान आता अंमली पदार्थांच्या विरोधात प्रशासन कोणती कठोर पावलं उचलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच आता या पोलीस हवलदारावर कोणती कारवाई होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
Nashik News : नाशिकममध्ये आणखी एक मोठी कारवाई, शहर हद्दीत सापडला अंमली पदार्थांचा मोठा साठा