एक्स्प्लोर

Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 November 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 05 November 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मंगलमय असणार आहे. जे व्यवसायिक आहेत त्यांना चांगली ऑफर मिळू शकते. त्यामुळे तुमची खूप धावपळ होऊ शकते. पण ऑर्डर्स आल्यामुळे तुम्ही खूप खुश असाल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, आज तुमची अनोळखी लोकांबरोबर देखील चांगली ओळख होईल.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा खर्चिक असेल. आज तुम्हाला थोडं तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यामुळे जास्त वस्तूंची खरेदी करु नका. तुमच्या आरोग्याच्या संबंधित तुमच्या कुटुंबियांना चिंता सतावू शकते. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी तुम्ही भजन, कीर्तनात सहभागी व्हा. यामुळे तुमच्या मनाला शांती लाभेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वैवाहिक जीवनात तुम्ही आनंदी असाल. नात्यामध्ये प्रेम वाढेल. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच लग्नाच्या संबंधित शुभ वार्ता मिळू शकते. तसेच, कोणाबरोबरही कोणती गोष्ट शेअर करण्याआधी दहा वेळा विचार करा. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. तुमच्या जुन्या गोष्टीतून तुम्ही बोध घेणं गरजेचं आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज काही कारणामुळे तुमच्या कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. तसेच, आज तुमची जुन्या मित्राबरोबर भेट होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आज तुम्ही धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. कुटुंबात नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमचा दीर्घकालीन आजार आज तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल. तुमची चिडचिड होऊ शकते. यामुळे तुमचं कामात मनही रमणार नाही. अशा वेळी तुम्ही ध्यान योगासन करणं गरजेचं आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता किंवा नवीन वाहन खरेदी करु शकता. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही सामाजिक कार्यात जास्त सक्रिय असाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. जोडीदाराच्या साथीने तुम्ही चांगला व्यवसाय करु शकाल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. मित्रांच्या साथीने तुमची सगळी कामे सोपी होतील. 

तूळ (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. आज तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळेल. तुमच्या मुलांच्या आनंदासाठी तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमचे काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात, ज्यांना तुम्ही तुमच्या हुशारीने सहज पराभूत करू शकाल. तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीकडे पूर्ण लक्ष द्याल. तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाऊ देऊ नका.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

वृश्चिक राशीच्या लोकांना आज काही चढ-उतारांचा सामना करावा लागेल. व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळू शकते. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला त्यापासून आता आराम मिळेल. काही मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आज मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. तुम्हाला कर्जाच्या कोणत्याही व्यवहारापासून दूर राहावं लागेल. तुमच्या कामावर तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील.

धनु (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. व्यवसायात कोणताही निर्णय घेण्याच्या मोहात पडू नका, अन्यथा नुकसान होऊ शकतं. तुम्हाला एखाद्या कामात इतकं यश मिळेल की तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या असतील, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. तुमचा आणि तुमच्या जोडीदारात काही वाद असेल तर तेही संभाषणातून सोडवले जातील. तुमची मोठी इच्छा पूर्ण झाल्याने मन आनंदी असेल.

मकर (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असेल. आज त्यांना त्यांच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखावा लागेल. तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा पूर्ण लाभ मिळेल. खर्च वाढल्याने थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. आज तुमचं उत्पन्न देखील वाढेल, परंतु जास्त खर्चामुळे तुम्ही अनावश्यक तणावात राहाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या गरजांसाठी पैसे खर्च कराल. व्यवसायात तुम्ही काही बदल करू शकता, जे तुमच्यासाठी चांगलं राहील. भाऊ-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना नवीन पद मिळेल.

कुंभ (Aquarius Today Horoscope)              

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणारा आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचं एखादं काम जे खूप दिवसांपासून प्रलंबित होतं ते पूर्णही होऊ शकतं. आई-वडिलांची सेवा करण्यासाठीही थोडा वेळ काढाल. तुमच्या मुलाला नोकरीसाठी घरापासून दूर जावं लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. तुम्ही शिष्यवृत्तीशी संबंधित कोणत्याही परीक्षेला बसलात तर तुम्हाला त्यातही यश मिळेल.

मीन (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना चांगली बढती मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या घरी पाहुणे आल्याने तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. तुम्हाला उद्धटपणे बोलणं टाळावं लागेल, अन्यथा ते तुमचे तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी विनाकारण भांडण होऊ शकतं. कौटुंबिक संपत्ती मिळाल्यानंतर आनंदी व्हाल. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ketu Gochar : 10 नोव्हेंबरपासून पालटणार 3 राशींचं नशीब; पापी ग्रह केतूची चाल बदलणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget