एक्स्प्लोर
कल्याणमध्ये सुप्रसिद्ध बिल्डर आसिफ झोजवालांची आत्महत्या
बिल्डर व्यवसायिक असलेले आसिफ झोजवाला भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी होते.
कल्याण : कल्याणमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एमसीएचआयचे सदस्य आसिफ झोजवाला यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झोजवाला यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
बिल्डर व्यवसायिक असलेले आसिफ झोजवाला भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी होते. कल्याण पश्चिमेतील कल्याण-मुरबाड रोडवर 'राणी मॅन्शन'मध्ये आसिफ झोजवाला राहत होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
झोजवालांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचप्रमाणे झोजवाला तणावात असल्याची माहितीही कुटुंबीयांनी दिलेली नाही.
आसिफ यांचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.
2015 मध्ये ठाण्यातील सुप्रसिद्ध बिल्डर सुरज परमार यांनी आत्महत्या केली होती. झोजवालांच्या आत्महत्येमुळे त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement