एक्स्प्लोर

Jaipur Express Firing : डोकं आणि छातीत गोळ्या लागून RPF अधिकाऱ्यासह प्रवाशांचा मृत्यू, चारही मृतांना 11 गोळ्या लागल्या

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. चारही मृतांना एकूण 11 गोळ्या लागल्याचं अहवालात म्हटलं आहे.

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील गोळीबार (Firing) प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल (Post Mortem Report) समोर आला आहे. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना गोळ्या लागल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतांच्या मुख्यत्वे करुन डोक्याला आणि छातीत गोळ्या लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुंबईतील सर जे जे रुग्णालयात (J J Hospital) या चारही जणांचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. चारही मृतांना एकूण 11 गोळ्या लागल्याचं अहवालात म्हटलं आहे.

धावत्या ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार

दरम्यान, मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलैच्या पहाटे हत्याकांड घडलं. धावत्या ट्रेनमध्ये झालेल्या या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह चार जणांचा मृत्यू झाला. मारेकरी हा आरपीएफ (RPF) शिपाईच होता, जो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्याच ट्रेनमध्ये तैनात होता. आरोपी शिपाई चेतन सिंह याला जीआरपीने अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले होते. 

चारही मृतांना 11 गोळ्या लागल्या

शवविच्छेदन अहवालानुसार, या घटनेतील चार मृतांना 11 गोळ्या लागल्या आहेत. आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांना चार गोळ्या लागल्या होत्या. तर असगर अब्बास शेख यांना तीन गोळ्या तसंच मोहम्मद हुसेन बुरहानपूरवालाआणि सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांना प्रत्येकी दोन गोळ्या लागल्या होत्या. अवयवांना गोळ्या लागल्याने अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.

एकामागोमाग चार जणांचा जीव घेतला

आरपीएफ शिपाई चेतन सिंहने त्याचे वरिष्ठ असलेल्या एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांना गोळ्या घालून जीव घेतला. बी-5 कोचमध्ये टिकाराम मीणा, बी-4 कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पँट्री कारमध्ये असलेल्या सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांचीएकामागोमाग हत्या केली. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. यावेळी आरोपीने खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीआरपीने त्याला पकडलं.

त्या रात्री कोण कोण होते ड्युटीवर?

मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये त्या रात्री ASI टिकाराम मीणा (वय 58 वर्षे), पोलीस हवालदार नरेंद्र परमार (वय 58 वर्षे), शिपाई अमेय आचार्य (वय 26 वर्षे) आणि शिपाई चेतन सिंह (वय 33 वर्षे) ड्युटीवर होते. 

या सर्वांची 28 जुलैपासून एक आठवड्याभर मेल पॅसेन्जर गाड्यांवर एस्कॉर्टिंग करण्याची ड्युटी नेमलेली होती. 

रविवारी रात्री नऊच्या दरम्यान सौराष्ट्र मेल या ट्रेनमधून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एक्सॉर्ट करत सूरतपर्यंत गेले आणि सूरतवरुन जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने एक्सॉर्ट करत मुंबईला येत होते तेव्हा हा प्रकार घडला. 

हेही वाचा

Jaipur Express Firing : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण; चौथ्या मृताची ओळख पटली, अजमेर शरीफहून परतताना झाला गोळीबार

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
Video: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, महिला संतापली; कारमधून उतरत मंत्री महाजनांना सुनावलं
CSMT : एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकल आमनेसामने, सीएसएमटी स्टेशन मास्तर निलंबित, रेल्वे प्रशासनाची कारवाई
एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकल आमनेसामने, सीएसएमटी स्टेशन मास्तर निलंबित, रेल्वे प्रशासनाची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 2200 टक्के रिटर्न, जाणून घ्या
पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल
Kerala Blast : केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
बालविवाह मुक्त अभियान, ‘स्पेशल फोर्स’ची धडक कारवाई; राज्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 बालविवाह रोखले
Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?
Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
लोणावळा फिरायला जाताय? ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान; व्हिला बुकींचा स्कॅम, पर्यटकाची हजारोंना फसवणूक
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
Embed widget