एक्स्प्लोर
वसईत पतीनंच पत्नीला वेश्या व्यवसायात लोटलं
वसई: व्यवसायात भांडवलाची रक्कम कमी पडत असल्यानं पतीनं चक्क आपल्या पत्नीलाच वेश्या व्यवसायात लोटल्याची धक्कादायक घटना वसईत समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला वालीव पोलिसांनी बेड्या ठेकाल्या आहेत.
वसईच्या वालीव पोलीस स्थानकात एका 33 वर्षीय घटस्फोटीत महिलेशी विवाह करून तिला बळजबरीने वेश्या व्यवसायाला प्रवृत्त करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सौरभ कपिल पांडे हा तिला 2012 ते 2013 या काळात राज्यातील विविध ठिकाणी आणि मुंबईतील मालाड मालवणी, मीरारोड आणि इतर शहरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवत होता.
वेश्या व्यवसायाला नकार दिल्यानंतर पहिल्या पतीपासून असलेल्या दोन मुलांना ठार मारण्याची धमकीही आरोपी सौरभ पांडे देत असल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे. आरोपीने आधी प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्न केलं.
सौरभ हा फेब्रिकेशनचा व्यवसाय करत होता. त्याला आपला व्यवसाय वाढविण्यासाठी पैशाची गरज होती. म्हणून यासाठी आरोपीनं आपल्या पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. सुरुवातीला तिने याला नकार दिल्यानंत आरोपीनं तिला मारहाण करुन सिगरेटचे चटके देणं सुरु केलं आणि बळजबरीनं वेश्या व्यवसयात ढकललं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement