एक्स्प्लोर
शारदाश्रम शाळेत आजी-आजोबा दिवस संपन्न
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर प्रभागातील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत १५ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय आजी आजोबांसाठी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी - आजोबा हल्लीच्या नातवंडांना अनुभवता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर प्रभागातील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत १५ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय आजी आजोबांसाठी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी - आजोबा हल्लीच्या नातवंडांना अनुभवता यावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विभाग निरीक्षिका वर्षा गांगुर्डे, शारदाश्रम विद्यामंदिर संस्थेच्या उपकार्याध्यक्षा मिलन सुळे, आणि समुपदेशक श्वेता खंडकर हे मार्गदर्शक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना पुन्हा एकदा शाळेत येण्याची संधी मिळाली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी आजी आजोबांच्या नात्यावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी वर्षा गांगुर्डे यांनी याप्रसंगी निरोगी आणि आनंददायी जीवनासाठी नियमित व्यायाम, योगा आणि वाचनाचे महत्व सांगितले. आरोग्याच्या तसेच कौटुंबिक समस्यांवर मात करून छंद जोपासावेत, आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा उपयोग समाजातील इतर गरजू लोकाना व्हावा यासाठी प्रयत्न करा असेही सांगितले. समुपदेशक श्वेता खंडकर यांनीही ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवस’ या विषयावर पालकांचे उद्बोधन केले. या आजी-आजोबांना ही चिमुकली मंडळी सारी अगदी हवीहवीशी वाटतात. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आजोबा आणि आजी यांच्या जगात हे रमून जातात. मनावर नकळत कित्येक संस्कार होतात आणि फुलणाऱ्या फुलास आजी आजोबा नावाचं हे प्रेमरूपी झाड का हवं असतं याचं उत्तर देवून जातात. आपली मुलं खूप मोठी झाली आणि त्यांचं बालपण आता तरुणपणात बदलून गेले आणि या नातवाच्या रूपाने हे बालपण पुन्हा आपल्या भेटीस आले. सकाळच्या अगदी उठण्या पासून कित्येक संस्कार या चिमुकल्या मनावर करताना त्यांना आपण आता एक वडील नाही तर एक आजोबा आहे याची कुठेतरी जाणीव होते. आजी-आजोबा मुलांना मनापासून स्वतःचा वेळ देतात मुलांत मूल होऊन आजी-आजोबा रमतात म्हणूनच ते त्यांना फार प्रिय असतात असे आजी आणि नातवाच्या नात्यातील पैलू उलगडून अगदी सहज सोप्या शैलीत आजी आजोबांना आपली भूमिका कशी असावी हे पटवून दिले. मुख्याध्यापिका मनिषा ताडमारे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शारदाश्रम विद्यामंदिर शाळा ज्ञानरचनावादी आणि डीजीटल तर झाली आहेच याचबरोबर अशा प्रकारे विविध उपक्रम राबवत असल्यामुळे शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना पुन्हा एकदा शाळेत येण्याची संधी मिळाली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी आजी आजोबांच्या नात्यावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी वर्षा गांगुर्डे यांनी याप्रसंगी निरोगी आणि आनंददायी जीवनासाठी नियमित व्यायाम, योगा आणि वाचनाचे महत्व सांगितले. आरोग्याच्या तसेच कौटुंबिक समस्यांवर मात करून छंद जोपासावेत, आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा उपयोग समाजातील इतर गरजू लोकाना व्हावा यासाठी प्रयत्न करा असेही सांगितले. समुपदेशक श्वेता खंडकर यांनीही ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवस’ या विषयावर पालकांचे उद्बोधन केले. या आजी-आजोबांना ही चिमुकली मंडळी सारी अगदी हवीहवीशी वाटतात. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत आजोबा आणि आजी यांच्या जगात हे रमून जातात. मनावर नकळत कित्येक संस्कार होतात आणि फुलणाऱ्या फुलास आजी आजोबा नावाचं हे प्रेमरूपी झाड का हवं असतं याचं उत्तर देवून जातात. आपली मुलं खूप मोठी झाली आणि त्यांचं बालपण आता तरुणपणात बदलून गेले आणि या नातवाच्या रूपाने हे बालपण पुन्हा आपल्या भेटीस आले. सकाळच्या अगदी उठण्या पासून कित्येक संस्कार या चिमुकल्या मनावर करताना त्यांना आपण आता एक वडील नाही तर एक आजोबा आहे याची कुठेतरी जाणीव होते. आजी-आजोबा मुलांना मनापासून स्वतःचा वेळ देतात मुलांत मूल होऊन आजी-आजोबा रमतात म्हणूनच ते त्यांना फार प्रिय असतात असे आजी आणि नातवाच्या नात्यातील पैलू उलगडून अगदी सहज सोप्या शैलीत आजी आजोबांना आपली भूमिका कशी असावी हे पटवून दिले. मुख्याध्यापिका मनिषा ताडमारे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शारदाश्रम विद्यामंदिर शाळा ज्ञानरचनावादी आणि डीजीटल तर झाली आहेच याचबरोबर अशा प्रकारे विविध उपक्रम राबवत असल्यामुळे शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. आणखी वाचा























